esakal | नांदेड वाहतूक शाखेची धाडशी कारवाई: ७९ बुलेटसह १३९ दुचाकी केल्या जप्त; पाच लाखाचा दंड वसुल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नियम तोडणाऱ्या दुचाकींवर आरटीओंकडून दंडात्मक कारवाई सुरु

नांदेड वाहतूक शाखेची धाडशी कारवाई: ७९ बुलेटसह १३९ दुचाकी केल्या जप्त; पाच लाखाचा दंड वसुल

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : बुलेटच्या मुळ सायलेन्सरमध्ये बदल करुन कर्णकर्कश आवाज काढणारे सायलन्सर बसवून शहरातून बिनबोभाटपणे बुलेट चालविणाऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने बुलेटसवारच्या नियोजनावर वाहतुक शाखेने पाणी फेरले आहे. या बुलेटवर कारवाया करत आजपर्यंत ७९ बुलेटसह एकुण १३९ दुचाकी जप्त केल्या. आता या दुचाक्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी सोमवारी (ता. २२) फेब्रुवारी रोजी वाहतूक शाखेत दाखल झाले.

शहरातील रस्त्यावरुन कर्णकर्कश आवाज काढत धूम ठोकणे, फॅन्सी नंबर प्लेट बसविणे, फटाक्याचे आवाज काढणे अशा दुचाक्यावर पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे यांच्या आदेशावरुन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी कामाला लागले. रविवारी (ता. १४ ) फेब्रुवारीपासून ७९ बुलेट व ६० दुचाकी अशा एकुण १३९ दुचाक्या ताब्यात घेतल्या आहेत. 

चार लाख ८० हजाराचा दंड आकारण्यात आला

दरम्यान या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहतूक शाखेचे पोनि कदम यांनी अहवाल पाठविल्यानंतर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक मेघल अनासने, निरंजन पुनसे व इतर कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखेला भेट देऊन जप्त केलेल्या बुलेट व इतर दुचाक्याची तपासणी केली. सायंकाळपर्यंत दुचाकी चालकाकडून चार लाख ८० हजाराचा दंड आकारण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेकर कदम, कर्मचारी रवींद्र राठोड, पंकज इंगळे, अंकुश आरदवाड आदीनी परिश्रम घेतले. 

वाहनचालकांनो परवाना जवळ ठेवा

शिवजयंतीच्या मिरवणुकीतील दुचाकी चालकांनी पोलिस निरीक्षक दिसताच आपल्या दुचाकी अन्य रस्त्याने पळविल्या. बेसावध असलेल्या काही दुचाकी पोलिसांच्या तावडीत सापडल्या. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. लवकरच आता फॅन्सी नंबर प्लेट, काळी फिल्म आणि विनापरवानगी वाहतुक यावर कडक कारवाई करण्यात येणार. 
- चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा, नांदेड.
 

loading image
go to top