प्रियकराने केला प्रेयसीचा खून...अन् अडकला...

उमाकांत पंचगल्ले
Tuesday, 23 June 2020

लग्न कर असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढणाऱ्या प्रियकराला मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतले. ही खूनाची घटना सोमवारी (ता. २२) रोजी धनगरवाडी (ता. देगलूर) शिवारात तब्बल तीन दिवसांनी उघडकीस आली

हाणेगाव (ता. देगलूर) : अगोदर प्रेमाची शपथ, त्यांनतर लग्नाचे आमिष दाखवून मागील काही दिवसापासून सतत प्रेयसीवर अत्याचार. समाजात आपली बदनामी झाली आता लग्न कर असा तगादा लावणाऱ्या प्रीयसीचा काटा काढणाऱ्या प्रियकराला मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतले. ही खूनाची घटना सोमवारी (ता. २२) रोजी धनगरवाडी (ता. देगलूर) शिवारात तब्बल तीन दिवसांनी उघडकीस आली. मृतदेह छन्नविच्छन्न झाला होता. 

देगलूर तालुक्यातील धनगरवाडी येथील १८ वर्षीय तरुणीचे प्रेम लोणी (ता. देगलूर) येथील भरत संजय गायकवाड (वय २१) याच्यासोबत होते. प्रेमातून पुढे त्यांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. या दोघांचे प्रेमप्रकरण संबंध नातेवाईक व गावकऱ्यांना माहित होते. तो नेहमी आपल्या प्रीयसीला बाहेरगावी नेत असे. त्यांन घरच्यांचाही विरोध नव्हता. हे दोघेजण २० जून रोजी बाहेर गेले. ते पर आलेच नाही. मुलीचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती गावशेजारी असलेल्या एका जंगलात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. 

वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच देगलूर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे, मरखेल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी घटनास्थळी गाठले. घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहाची ओळख लवकर पटली नाही. मात्र गावकऱ्यांनी मयत ही धनगरवाडीची असल्याचे पोलिसांना संगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ही घटना प्रेमप्रकरणातून झाली असावी असा अंदाज बांधला. मयत मुलीच्या नातेवाईकानी आमच्या मुलीचे व लोणी येथील भरत गायकवाड याचे प्रेमसंबंध होते असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह सराकीर रुग्णालयात दाखल केला. 

हेही वाचा -  गोदावरीचे पावित्र्य राखा, अन्यथा गय नाही...असा इशारा कोणी दिला? वाचा...

गळा आवळून खून केल्याचा अंदाज

मारेकऱ्याने तिच्यावर आधी अत्याचार करून नंतर तिचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या दोघांचा शनिवारी (ता. २०) मुलगा व मुलगी दोघेपण घरातून निघून गेले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची पण झाली होती. लगेच दोन दिवसानंतर सोमवारी (ता. २२) मुलीचा मृतदेह गावाच्या बाजूला असलेल्या शिवारात आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला.

मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रात्री उशिरा जनाबाई केरबा सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन मरखेल पोलिस ठाण्यात भरत गायकवाडविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी भरत गायकवाड याला ताब्यात घेतले असून या प्रकरणात अजून कोणी त्याचे साथीदार आहेत का याची सखोल चौकशी पोलिस करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy friend killed his beloved and got stuck nanded news