किनवट (जि. नांदेड) : ज्या हातांनी कुटुंबाच्या उन्नतीसाठी मेहनत घेतली, तेच हात मृत्यूनंतरही पाच जणांच्या जीवनात प्रकाश आणणारे ठरले. एका ऑटोरिक्षाचालकाच्या तरुण मुलाच्या अवयवदानाने तीन कुटुंबांना नवजीवन मिळाले आहे..ओमकार अशोक आकुलवार (वय १९, रा. मांडवा, ता. किनवट) हा तरुण फर्निचर काम करून कुटुंबाला मदतीचा हात देत होता. त्याचे वडील, अशोक आकुलवार ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ओमकारचे भविष्य उज्ज्वल असताना एका दुर्दैवी अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. .त्याचे झाले असे, की ओमकार आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त इतर दोन मित्रांसोबत ता. २२ रोजी गेला होता. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीने घरी परतत असताना बी.पी. कॉलेजसमोरील विसावा ढाब्याजवळ अचानक रस्त्यावर आलेल्या एका प्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. .त्यामुळे झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आदिलाबाद येथे रेफर करण्यात आले. येथून त्यास नागपूरच्या मेडिकल ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी ओमकारला ब्रेनडेड घोषित केले. या धक्क्याने कुटुंब हादरले. मात्र, ओमकारच्या वडिलांनी दु:खावर मात करून मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला..त्यांच्या संमतीने ता. २४ रोजी दुपारी दोनला ओमकारला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि त्याचे अवयवदान करण्यात आले. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सूचनेनुसार, ओमकारची दोन मूत्रपिंडे आणि एक यकृत तातडीने तीन गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आली. त्याचे डोळेदेखील लवकरच गरजूंमध्ये प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. ओमकारच्या अवयवदानातून तीन जणांना नवजीवन मिळाले आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळी आठच्या सुमारास मांडवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान बहीण असा परिवार आहे..Road Accident : कारच्या अपघातात मुख्याध्यापकाचा मृत्यू.माणुसकीच्या नात्याने दिला उज्ज्वल संदेशगरिबीशी झुंज देणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या मुलाने मृत्यूनंतरही समाजाला अमूल्य देणगी दिली. मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेत वडिलांनी केवळ आपल्या मुलाला अमर केले नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला, तो म्हणजे ‘मृत्यूनंतरही आपण कोणाला तरी जीवन देऊ शकतो’ असा. ओमकारच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तिघांच्या घरांमध्ये आनंदाची प्रकाशकिरणे पसरली. हा केवळ अवयवदानाचा निर्णय नव्हता, तर माणुसकीच्या नात्याने दिलेला उज्ज्वल संदेश ठरला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.