Breaking : डुकरांनी ताेडले मृतदेहाचे लचके; नांदेडकरांचा विष्णुपुरीच्या रुग्णालयावर राेष

file photo
file photo

नांदेड : येथील शंकरारव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आज (बुधवार) सकाळच्या प्रहरी अज्ञात मृतदेहाचे डुकरे लचके ताेडत असताना काही जणांना दिसले. त्यामुळे परिसरात एकच गाेंधळ उडाला. हा मृतदेह साधारणतः दाेन ते तीन दिवसांपुर्वी परिसरात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रुगणालय व्यवस्थापनावर नागरिकांचा राेष वाढला आहे. या प्रकाराची तातडीने चाैकशी झाली पाहिजे असाही सूर व्यक्त हाेत आहे.

विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालय परिसरात एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके तोडताना वराह (डुकर) दिसत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या भावना बोथट झाल्या की काय असा संतापजणक प्रश्न उपस्थित होत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी व प्रंचड चिड आणणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन रुग्ण किंवा मयताबाबत किती गंभीर आहे याचे हे जीवंत उदाहरण आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २०) सकाळी काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. कुजलेला मृतदेह पाहण्याची हिमत होत नव्हती. 

नांदेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्याविष्णुपूरी येथे कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. हे रुग्णालय प्रशासन नेहमीच याना त्या कारणाने प्रकाश झोतात असते. कधई रुग्णालयीन कर्मचाऱअयात अंतर्गत वाद तर कधी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत कर्मचाऱ्याचे उद्धट वागणे व बोलणे हे नित्याचेच असते. अनेकवेळा ग्रामिण भागातून आलेले गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश दिल्या जात नाही. कधई सुरक्षांकडून नातेवाईकांची हेटाळणी केल्या जाते. या सर्वच प्रकाराकडे रुग्णालय प्रशासन डोळेझाक करत असते. त्यामुळेच अनेक गरुग्ण कर्ज काढून खासगी रुग्णालयाची वाट धरतात. त्याला सर्व जबाबदार येथील प्रशासन अशल्याचे बोलल्या जाते. 

बुधवारी (ता. २०) जानेवारी वेळ सकाळी साडेसातच्या सुमाराची. रुग्णालय परिसराच्या एका प्रवेशद्वाराला लागून कचऱ्याच्या ढीगाभोवती एक मृतदेह पजडलेला होता. पुरुष जातीच्या या मृतदेहाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह नाही तेथील रुग्णालय प्रशासनाच्या किंवा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला नाही. त्या मृतदेहाचे लचके तोडून खाताना डुकरांचा कळप दिसत होता. यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनाही मोठा धक्का बसला. डुकरांना हाकलण्याचा त्यांनी प्रय्तन केला मात्र डुकरांचा कळप त्याचे लचके तोडण्यात मग्न होता. तर कैाही डुकरे जवळ आलेल्या नागरिकांच्या अंगावर धावत येत होते. 

रुग्णालय प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालय प्रशासनाने दरवेळेस ताब्यात घेऊन शवविच्छेदन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले असते तर हा संतापजनक प्रकार समोर आला नसता. यापूर्वीही रुग्णांच्या नातेवाईकांवर तेथील मोकाट सोडलेल्या डुकरांनी व श्वानांनी प्राणघातक हल्ले केलेले आहेत. यात काही महिला व लाहन मुल जखमीसुद्धा झाले होते. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांकडून उरलेले शिळे अन्न रुग्णालय परिसरात उघड्यावर टाकल्या जात असल्याने त्यावर मोकाट डुकरांचा व कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला पहावयास मिळतो. आता तर चक्क एका मृतदेहाचे लचके तोडतानाचे चित्र समोर आल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी लक्ष घालून संबंधीत यंत्रणेवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांतून होत आहे. रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी फोन घेत नव्हते.

याबाबत अधीष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,सदरील मृतदेह हा शासकिय रुग्णालयाच्या मुखअय प्रवेशद्वाराजवळ आढळून आला आहे. त्यामुळे त्या मृतदेहाशी काही संबध नाही. घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पंचनामा झाल्यानंतर व उत्तरीय तपासणीअंती काय ते समोर येईल. तोपर्यंत काही सांगता येणार नाही. 

-डाॅ. सुधीर देशमुख, अधीष्ठाता, नांदेड.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com