esakal | नांदेड जिल्ह्यात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

यश मिराशे

नांदेड जिल्ह्यात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर (जि.नांदेड) - शहरातील (Himayatnagar) गजबजलेल्या बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा दिवसाढवळ्या खुन करण्यात आला आहे. अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही खुनाचा थरार शनिवार (ता.११) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडला. या घटनेमुळे शहरात (Crime In Nanded) खळबळ उडाली असुन नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरात यश उत्तम मिराशे (वय १७) याचा धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या छातीवर वार करून खुन करण्यात आला. यश सोबत असलेल्या सोहन शरद चायल (वय १८) ह्याच्या कमरेत धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले (Nanded) आहे. घटना घडल्यानंतर बसस्थानक परिसरातील काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून या गंभीर घटनेची माहिती दिली असता अर्धातास उशीराने पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Aurangabad Crime : पैठणमध्ये शेतात तरुण शेतमजुराचा खून

दरम्यान घटनेतील मुख्य आरोपी अनुज सुशांत पवनेकर (वय १९) याला पोलिसांनी अज्ञात ठिकाणावरून अटक केली असुन आणखी दोन आरोपी फरार असल्याचे बोलले जात आहे. दुपारी घटना घडल्यानंतर रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, जोपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होत नाही व सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात तणाव जन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांना अधिकची कुमक भोकर येथून मागवावी लागली. हिमायतनगर शहरात प्रथमच असा खुनाचा थरार घडल्याने, या घटनेचा परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमधे घटनाक्रम कैद झाल्याने याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात पाहिला गेल्याने नागरिक व विद्यार्थ्यांच्या पालकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा: अन् येथे थिजली माणुसकी! मृत्यूनंतरही मुलगा आला नाही जवळ ; शेवटी...

कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा

आज घडलेली खुनाची घटना तालुक्यात घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे. तालुक्यात अशा गंभीर घटना घडत असल्यामुळे पोलिसांप्रती जाहीर नाराजी आमदार जवळगावकरांनी व्यक्त केली. भोकरचे  उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजनकर हे घटनास्थळाला भेट देऊन रात्री उशीरापर्यंत शहरात तळ ठोकुन होते. वृत्त लिहीपर्यंत मृतावर कुठलेही सोपस्कार करण्यात आले नव्हते.

loading image
go to top