esakal | Aurangabad Crime : पैठणमध्ये शेतात तरुण शेतमजुराचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

लोहगाव (जि.औरंगाबाद) : दिन्नापूर-ढोरकीन रस्त्यावरील एका शेतात खुन झालेल्या घटना स्थळांची पाहाणी करताना गुन्हे शाखा टीम.

Aurangabad Crime : पैठणमध्ये शेतात तरुण शेतमजुराचा खून

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : दिन्नापूर - ढोरकीन रस्त्याजवळील पेहरकर फार्म येथे शेळ्या-कोंबड्या सांभाळणारा तरुण शेतमजुराचा शुक्रवार (ता.दहा) रात्री अज्ञाताने खुन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता.११) पहाटेच पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीप सूर्यभान साळवे (वय २५) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती (Paithan) अशी की ढोरकीन - लोहगाव रोडपासुन दिन्नापूर गावाकडे जाणाऱ्या रोडलगत औरंगाबाद येथील रामभाऊ पेहरकर यांचे गट क्रमांक ३३७ मध्ये शेती आहे. या शेतात शेळ्या कोंबड्याचा सांभाळ करण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) शहरातील आंबेडकरनगर येथील संदीप साळवे हा शेतमजूर कामाला होता. शुक्रवारी रात्री त्यांचा अज्ञाताने डोक्याजवळ जबर फटका (Crime In Aurangabad) देऊन खून केल्याची घटना घडली. दिन्नापूर येथील रामेश्वर खाटीक हा रात्री गावातील कीर्तन संपल्यावर या शेतावर गेला असता त्याला संदीपचा खून झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: गुरूच्या विरहाने शिष्यानेही सोडला श्वास, विलास शेटे यांचे निधन

त्याने शेतमालकाला ही माहिती कळवली शेतीमालकाने मध्यरात्री नंतर पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांना खबर दिली. असता सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, फौजदार दिलीप चौरे आदींनी पहाटेच घटनास्थळी धाव घेऊन मृताचा पंचनामा करून मृतदेह पैठण ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, फौजदार दिलीप चौरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, फौजदार विजय जाधव, वाल्मिकी निकम, हरिश्चंद्र मोरे, राजेंद्र चव्हाण, खंडू मचरे आदी करित आहेत.

loading image
go to top