
केसात असलेल्या लिखा, उवा, डोक्याला झालेली जखम, घोंगावणारे चिलटं व माशा यातून मुक्ताबाईला मुक्त व्हायचं होतं. परंतु जटा सोडल्यावर देवीचा कोप होईल, ही भीती मुक्ताबाईला वाटत होती. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताबाईचे प्रबोधन करून तिला जटामुक्त केले आहे.
नांदेड : गत २० वर्षांपासून रत्नेश्वरी मंदिर परिसरात मुक्ताबाई नावाची एक महिला राहते. तिच्या केसात असलेल्या लिखा, उवा, डोक्याला झालेली जखम, घोंगावणारे चिलटं व माशा यातून मुक्ताबाईला मुक्त व्हायचं होतं. परंतु जटा सोडल्यावर देवीचा कोप होईल, ही भीती मुक्ताबाईला वाटत होती. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताबाईचे प्रबोधन करून तिला जटामुक्त केले आहे.
नांदेड पासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर रत्नेश्वरीचे पुरातन मंदिर आहे. ही टेकडी रत्नागिरी म्हणून सुद्धा ओळखली जाते. या मंदिर परिसरात त्रिशूळ कुंड नावाचे एक कुंड आहे. एक महादेवाचे मंदिर आहे, फुल-हार, नारळाची दोन चार छोटी दुकाने आहेत, विस्तारलेली वडाची झाडे व बाजूला एक लहान सरोवर आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग आणि काही सामाजिक संस्थांनी झाडे लावली आहेत. रविवार सोडला तर फारशी गर्दी नसलेले हे ठिकाण नांदेडवासीयांसाठी एक सहलीचे केंद्र आहे.
हेही वाचा - Success story: पळसा येथील शेतकऱ्याने एक हेक्टर शेतीत रोपवाटिका व फळबागेतुन घेतले चांगले उत्पन्न
अशी काढली मुक्ताबाईच्या मनातील भिती
याच रत्नेश्वरी मंदिर परिसरात मुक्ताबाईचा वीस वर्षांपासून मुक्त संचार आहे. मंदिर परिसराची झाडलोट करायची. येणाऱ्या भाविकांनी किंवा पर्यटकांनी दिलेलं खायचं आणि रात्रीच्या वेळी बंद झालेल्या दुकानासमोर झोपायचं, अशी मुक्ताबाईची दिनचर्या. परंतु हा त्रास सहन करायचा असतो असा समाज रुढी परंपरेने तिच्या मनामध्ये होता. परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार असे तिला वाटत होते. 'अंनिस’ने मुक्ताबाईच्या मनातील ही भीती दूर केली. सहलीसाठी रत्नेश्वरीला गेलेल्यास 'अंनिस’ नांदेडच्या जिल्हा प्रधान सचिव रंजना यांनी मुक्ताबाईच्या मनाती भीती घालवताच मुक्ताबाई जटा काढण्यासाठी तयार झाली.
हे देखील वाचाच - विधायक बातमी : लोकसहभागातून तयार होणारा पुल पूर्णत्वाकडे एकीचे ज्वलंत उदाहरण
यांचे मिळाले सहकार्य
मुक्ताबाईला जटापासून मुक्त करण्यासाठी स्थानिक दुकानदार मधुकर अंभोरे, निर्मला काशिनाथ फुलारी, उत्तम भाले, शांताबाई झांबरे, शालिनी पेन्शनवार, चंद्रकांत, शोभाताई प्रकाश फुलारी, संजय भाले यांच्यासह रंजना, युवा कार्यवाह प्रतिभा कोकरे, नितीन ऐंगडे, नांदेड शाखा सचिव श्रीनिवास शिंदे, माजी राज्य प्रशिक्षण सहकार्यवाह आनंद बिरादार व सम्राट हटकर यांनी सहकार्य केले.
मोठे जोखीमीचे होते काम
कोविड-१९ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जटा कापायला सुरुवात केली. केसांच्या मुळापासून जटा तयार झालेली होती. जटा कडक व न वाळणारी होती. त्यात उवा होत्या, चिलटांसारखे कीडे घोंगावत होते. जटेवर खालच्या बाजूला मुंग्या होत्या. डोक्यात जखमा (फोड) होत्या, त्यावर कापसाचे बोळे ठेवले होते. जखमा ओल्या असल्यामुळे बोळे जखमेवर राहत नव्हते. दुर्गंधी येत होती. कात्री खूप काळजीपूर्वक हाताळावी लागली.
- सम्राट हटकर, कार्यकर्ता (अंनिस, नांदेड)