लोहा शहरात ‘इतक्या’ लाखाची धाडशी घरफोडी... वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

रोख रक्क्म व सोन्या- चांदीचे दागिणे असा सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी रविवारी (ता. १४) पहाटे दोनच्या सुमारास झाली. 

नांदेड : लोहा शहरातील गणेशनगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन रोख रक्क्म व सोन्या- चांदीचे दागिणे असा सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी रविवारी (ता. १४) पहाटे दोनच्या सुमारास झाली. 

लोहा शहरातील गणेशनगर येथे राहणारे बालाजी रानबा शिंदे हे आपले घर बंद करून मुळ गावी वळसंगवाडी (ता. लोहा) येथे ता. १३ जून रोजी परिवारासह घरी गेले होते. रात्री चोरट्यांनी त्यांच्या दुसऱ्या घरावरून त्यांच्या घरावर उतरून पायऱ्यानी खाली आले. मुख्य दाराचे कुलूप बनावट किल्लीने उघडून घरात प्रवेश केला. कपाटातील नगदी अडीच लाख रुपये व सोन्या- चांदीचे दागिने असा तिन लाख १७ हजाराचा ऐवज लंपास केला. 

लोहा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा

रविवारी (ता. १४) सकाळी परत घरी गेल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांना समजले. यावेळी त्यांनी लोहा पोलिस ठाण्यात जावून आपल्या घरी घरफोडी झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर लगेच लोहा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन बालाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. आर. कऱ्हे करत आहेत. एवढ्या मोठ्या धाडशी घरफोडीमुळे लोहा शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व होणाऱ्या घरफोडी व अन्य गुन्हेगारीवर वचक बसवावा अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा -  सोनखेडचे सैराट जोडपे औरंगाबादमधून ताब्यात

विनापरवानगी साडेतीन हजाराची दारु जप्त 

नांदेड : शहराच्या चंदासिंग कॉर्नर परिसरात असलेल्या जय महाराष्ट्र हॉटेलच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवानगी साडेतीन हजाराची देशी दारु पोलिसांनी जप्त केली. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदासिंग कॉर्नर परिसरात पोलिस नाईक प्रकाश बोदेमवाड हे आपल्या सहकाऱ्यांसह रविवार (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन जय महाराष्ट्र हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बसुन विनापरवानगी देशी दारु विक्री करत असणाऱ्या युवकास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून साडेतीन हजाराची देशी दारु जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात हजर केले. प्रकाश बोदेमवाड यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. चक्रधर करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary of so many lakhs in Loha city nanded news