समस्यांच्या गर्दीत हरवलेले बसस्थानक, प्रवेशासाठी ज्येष्ठ - दिव्यांगांनाही करावी लागते तारेवरची कसरत 

शिवचरण वावळे
Wednesday, 2 December 2020

नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक मात्र याला अपवाद ठरते. हिवाळ्यात देखील बसस्थानकात मोठी - मोठी खड्डे पडुन त्यात गटाराचे घाण पाणी साचते. त्यामुळे बसस्थानकात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. बसस्थानकात प्रवेश करणारे ज्येष्ठ - दिव्यांग प्रवाशांना देखील खड्डे आणि साचलेल्या गटाराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. यातून रस्ता काढताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. 

नांदेड - बसस्थानक म्हंटले की वर्दळीचे ठिकाण. त्याला नांदेडचे बसस्थाकही अपवाद नाही. जिल्ह्यासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, विदर्भ अशा अनेक ठिकाणाहून रोज शेकडो बसेस ये-जा करतात. कोसो दुरवरुन आलेल्या बसला स्थानकात प्रवेश करताच खड्डेमय रस्ते, गटाराचे पाणी आणि पार्कींग यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समस्यांचे माहेरघर बसस्थानक बनले आहे.
 
पावसाळ्यात बसस्थानकात मोठे मोठी खड्डे पडुन त्यात घाण पाणी साचलेले असते. त्यातून बसला आणि बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना नाकाला फडके लावून प्रवेश करावा लागतो. हे चित्र नेहमीच असते. नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक मात्र याला अपवाद ठरते. हिवाळ्यात देखील बसस्थानकात मोठी - मोठी खड्डे पडुन त्यात गटाराचे घाण पाणी साचते. त्यामुळे बसस्थानकात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. बसस्थानकात प्रवेश करणारे ज्येष्ठ - दिव्यांग प्रवाशांना देखील खड्डे आणि साचलेल्या गटाराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. यातून रस्ता काढताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. 

हेही वाचा- नांदेड : रामतीर्थ ठाण्यातील दोन पोलिसांना न्यायालयीन कोठडी ​

मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट 

बसस्थानक परिसरातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून वाट काढीत आलेल्या प्रवाशांना कधी एकदा विसावा मिळेल असे वाटते. मात्र इथे आल्यावर देखील त्यांना धड बसायला जागा मिळत नाही. अनेक ठिकाणी घाण साठलेली असते. शिवाय मोकाट कुत्र्यांचा देखील सुळसुळाट असतो. त्यामुळे नेमके बसावे कुठे हा प्रश्‍न पडतो. 

थांबा एकीकडे तर बस दुसरीकडे ः 

लालपरीच्या विश्‍वासावर दुसऱ्या गावाला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसस्थानकात अनेक ठिकाणी खांबाला आणि छताला पंखे लटकलेली दिसतात. मात्र, त्यातील एकही पंखा सुरु नसतो. तेव्हा मात्र प्रवाशांना स्वतःच्या मनाची समजुत काढावी लागते आणि कित्तेक दिवसांपासून नादूरुस्त असलेल्या बंद पंख्यांवर नजर टाकत बस कधी येणार याची वाट बघावी लागते. बेसावधपणे बसची वाट बघत बसलेल्या प्रवाशांची बस दूर कुठेतरी लागलेली असते आणि अचानक कुणीतरी सांगते बस आली तेव्हा धांदल उडते. 

केवळ तीन एलईडी टिव्ही सुरू ः 

बसस्थानकात विरंगुळ्यासोबतच प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळावी यासाठी १२ डीजिटल एलईडी टिव्ही बसविण्यात आल्या आहेत. त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या बसची माहिती दिली जाते. मात्र यातील केवळ तीन एलईडी टिव्ही सुरु आहेत. त्यापैकी एका टिव्हीवर फक्त जाहिराती सुरु असतात. 

हेही वाचले पाहिजे - Video - नांदेडमध्ये सामुहिक तुलसी विवाहातच बांधली रेशीमगाठ

अनेक ठिकाणी कचरा साचलेला ः

खासगी कंपनीला कोट्यावधीचे साफसफाई टेंडर दिले गेले आहे. पाच ते सहा कर्मचारी बसस्थानकात साफसफाई करण्यासाठी असतात. मात्र, तरीही अनेक ठिकाणी कचरा साचलेला असतो. बसस्थानाकाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कचरा कुंड्यातुन कचरा बाहेर पडत असताना देखील कचऱ्याचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या विद्रुपीकरणात अधिकची भर पडते. 

मोकळ्या जागेत कचरा ः 

बसस्थानक आवारात असलेल्या लॉजिंगच्या बाजूस अनेक जण उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकतात. त्याच कचऱ्यावर जाऊन अनेकजण लघुशंका करतात. आजुबाजुने जाणाऱ्या महिला प्रवाशांना मात्र मान खाली घालून ये - जा करावी लागते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus stop lost in the crowd of problems For admission, seniors and the disabled also have to do a string exercise Nanded News