esakal | कंधारमध्ये काँग्रेस नगराध्यक्षांच्या नगरसेवक पुत्रांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

file photo}

कंधार शहरातील बौद्धद्वार येथील रहिवासी सौरभ बालाजी बिडवई (वय 26) यांच्यात व भावकीत एका दुकानाच्या संदर्भात वाद सुरु आहे

कंधारमध्ये काँग्रेस नगराध्यक्षांच्या नगरसेवक पुत्रांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : न्यायालयात वाद सुरु असलेले दुकान ताब्यात घेण्यावरुन सौरभ बिडवई यास मारहाण केल्याप्रकरणी कंधारच्या नगराध्यक्षा यांच्या दोन्ही पुत्रांसह चार जणांच्या विरोधात कंधार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार शहरातील बौद्धद्वार येथील रहिवासी सौरभ बालाजी बिडवई (वय 26) यांच्यात व भावकीत एका दुकानाच्या संदर्भात वाद सुरु आहे. हा वाद न्यायालयात चालू असल्याचे फिर्यादी सौरभ बिडवई यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा शोभाताई नळगे यांचे पुत्र नगरसेवक शहाजी अरविंद नलगे आणि दुसरे पुत्र विशाल अरविंद नळगे, शिवकुमार कोंडीबा बिडवई, मयुरी शिवकुमार बिडवई हे व इतर काही लोकांसोबत सौरभ बिडवई यांच्या घराला लागूनच असलेल्या दुकानाच्या सेटरचे कुलूप रविवारी (ता. 28) रोजी तोडत होते.

त्यावेळी सौरभ बिडवईने त्या लोकांना विरोध केला. या दुकानाचा वाद कोर्टात सुरु आहे. निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही इथे विनाकारण वाद घालू नका असे सांगितले. त्यावेळी शिवकुमार बिडवई यांनी शिवीगाळ केली. हातात असलेल्या काठीने सौरभच्या डोक्यात मारुन दुखापत केली. परत येऊ नकोस असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीचे वडील बालाजी बिडवई यांनी का मारता अशी विचारणा केली, तेव्हा शिवकुमार यानेत्यांनाही धक्काबुक्की केली. त्या वेळी वरील तिघेजण त्याच्यासोबत होते. या प्रकरणी सौरभ बालाजी बिडवई याच्या फिर्यादीवरुन कंधार पोलिस ठाण्यात नगरसेवक शहाजी नळगे यांचे लहान बंधू विशाल नळगे, शिवकुमार बिडवई आणि मयुरी या चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.