नायब तहसीलदारासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल | nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 नायब तहसीलदारासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नायब तहसीलदारासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड : नायब तहसीलदारासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तामसा (ता. हदगाव) : येथील शासनाच्या जमिनीवर गेलेल्या महसूल प्रशासनाने शेतात काम करणाऱ्या फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून तामसा पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. १७) हदगाव महसूल विभागाच्या नायब तहसीलदारासह सहा जणांविरुद्ध चौकशीअंती अट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या तक्रारीनुसार शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून चौघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा: नांदेड : पोषण आहारात आता प्रोटीनयुक्त बिस्कीट

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, ता. ११ नोव्हेंबर रोजी तामसा शिवारातील जांभळा रोडवर असलेल्या शासन शेत गट नंबर ४८६ या शेतावर महसूल विभागाचे नायब तहसीलदार गोपाळ हराळे, तामसा मंडळ अधिकारी संजय बिऱ्हाडे, तलाठी रुपेश जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, निवृत्त शिक्षक यांनी शेतात काम करीत असलेल्या फिर्यादी हिरकणबाई अशोक राठोड व तिचे पती अशोक पांडुरंग राठोड यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. पोलीस प्रशासनाने पाच दिवसाच्या चौकशीअंती अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधित कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जी. जी. रांजणकर हे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांच्या मदतीने करीत आहेत. तसेच तामसा महसूलचे मंडळ अधिकारी संजय बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक पांडुरंग राठोड व इतर अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

loading image
go to top