नांदेड : पोषण आहारात आता प्रोटीनयुक्त बिस्कीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

biscuite

नांदेड : पोषण आहारात आता प्रोटीनयुक्त बिस्कीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः कोरोना महामारीमुळे गत दीड वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील शाळा बंदच होत्या. यानंतर राज्य शासनाने बालकांना पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेतला असून, याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना खिचडीसह प्रोटीन व कॅल्शिअम मिळण्याच्या दृष्टीने बिस्किट देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीनंतर सध्या वर्ग पहिली ते चोथीपर्यंतचे शाळा अजूनही बंदच आहेत. मात्र, पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. कोरोना नियमावली अंतर्गत या विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे. या दरम्यान शालेय बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात पौष्टिक व स्वादिष्ट जेवणाचा समावेश करण्यात आला आहे. या संबंधात शिक्षण विभागाने मेनू कार्ड तयार केले आहे. यात विद्यार्थ्यांना खिचडीसह पौष्टिक व कॅल्शियम, प्रोटिनयुक्त जेवण देण्यात येणार आहे. यात पोषक तत्वांनी युक्त अशा बिस्कीटचा समावेश करण्यात आला आहे. शासकीय अनुदानित शालेय विद्यार्थ्यांना ही बिस्किटे दिली जाणार असल्याने त्याचा फायदा विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील बालकांना होणार आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

शालेय बालकांना न्युट्रिशियन स्लाईस म्हणून संबोधले जाणाऱ्या अशा कॅल्शियम व प्रोटीनयुक्त बिस्किट दिले जाणार आहेत. शालेय बालकांना खिचडी मिळत होती. आता ज्वारी, बाजरी, भात व सोयाबीनपासून तयार होणारे पौष्टिक बिस्कीटे मिळणार आहेत. त्याकरिता शासनाने नवीन मेनू कार्ड़ तयार केले आहे.

loading image
go to top