सावधान : सायबर गुन्ह्यांबबत सतर्कता हाच पर्याय- सायबर तज्ज्ञ

file photo
file photo
Updated on

नांदेड : सध्या आपल्या सर्वांना सहज उपलब्ध होत असलेल्या इंटरनेटमुळे आपली पावले कळत नकळत सायबर गुन्हेगारीकडे कधी वळतात हे आपल्या लक्षात येत नाही. फ्री किंवा मोफत भेटणाऱ्या इंटरनेटने आपल्या सर्वांना गुंतवुन ठेवण्यात यश मिळविले आहे. संप्रेषण साधने आणि रीअल- टाईम, डायनॅमिक डेटा स्त्रोतामुळे वापरकर्ते भौतिक मर्यादा नसल्यामुळे त्यांचे स्वतःचे प्रोफाइल तयार करू शकतात आणि याची पर्वा न करता इतर वापरकर्त्यांशी सहज संवाद करु शकतात.

हे करत असताना कुठली माहिती कोठुन आली? त्याचा स्त्रोत काय? ह्या माहितीचा खरेखुरेपणा काय? ह्या गोष्टींचा चिकीत्सक पद्धतीने विचार करण्याची तसदीसुद्धा आपल्याला घ्यायची गरज वाटत नाही. किंबहुना आपण एखादी पोस्ट व्हायरल करताना जास्तीत जास्त लाईक कमेंट कशा पद्धतीने मिळवता येतील ह्या विळख्यातुन बाहेर पडण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे.

प्रत्येकाने दक्षता घेणे काळाची गरज

हे न झाल्यास बिनबुडाच्या अफवा, गैरसमज निर्माण करणारे मजकुर, व्हायरल होणारे व्हीडीओ यातुन धार्मिक तेढ, सायबर बदनामीमुळे अनेकांची आयुष्य सोशल मिडीया हाताळण्याची संवेदनशीलता, कौशल्य नसल्याने उद्धवस्त होऊ शकतो. याची प्रत्येकाने दक्षता घेणे काळाची गरज बनली आहे. सायबर साक्षरता किंवा सायबर फिटनेस हे आजच्या घडीला अनिवार्य बनले आहे. सायबर बुलिंगचे गुन्हे कशा पद्धतीने घातक ठरु शकतात याची माहिती घेऊयात.  

सायबर बुलींगम म्हणजे काय ?

सायबरबुलिंग (Cyberbullying) संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या डिजिटल उपकरणाद्वारे एखाद्याची बदनामी करणे किंवा अफवा पसरवुन समाजातील शांतता भंग करुन तेढ निर्माण करणे सायबर गुंडगिरी होऊ शकते. सायबर गुंडगिरीमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हाटसअॅप, फेसबुक इतर अॅप्सच्या माध्यमातुन एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल, विशीष्ट समूहाबद्दल नकारात्मक, चुकीची माहिती प्रसारित केली जाते. 

सायबर गुंडगिरीत अधिकच भर पडली आहे

त्यातुन समाजमनात एक वेगळा संदेश जाऊन एकोपा सोहार्द धोक्यात येऊ शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल, समाजाबद्दल बनावट वेबपेज, व्हीडीओ, मजकुर, कंमेट्स व्हायरल करुन ऑनलाइन धार्मिक, वांशिक, पारंपारीक किंवा राजकीय द्वेष पसरविण्याचा हेतु असु शकतो. एखाद्याच्या सोशल मीडिया अंकाऊटवरुन, आॅनलाइन प्रोफाइलमधून माहिती प्राप्त करुन त्यात अनावश्यक माहिती मिसळली जाते व यानंतर ही माॅर्फिंग, मिक्सिंग केलेली माहिती ऑनलाइन छळ, ऑनलाइन बदनामी आणि इतर प्रकारच्या सायबर गुंडगिरीसाठी वापरले जाते. डेटा सेवांची वाढती उपलब्धता आणि सोशल मीडियाची भर यामुळे सायबर गुंडगिरीत अधिकच भर पडली आहे.   

सायबर बुलिंग टाळण्यासाठी हे करा

ँ सोशल मिडीयावर आलेल्या प्रत्येक अफवा, बदनामीकारक माहितीचा स्त्रोत, संदर्भ तपासुन घ्या.   
ँ अफवा  (Rumours) व सत्यता (Fact) ह्यामध्ये चिकीत्सक बुद्धीने फरक जाणुन घ्या.
ँ सोशल मिडीयावरील  प्रत्येक माहितीची विश्वासहर्ता जाणुन घ्यायला शिका. 
ँ माहिती तंत्रज्ञान युगात वावरताना स्वत:ची सद्सदविवेकबुद्धी संवेदनशीलपणे वापरुनच एखादी माहिती, मजकुर पोस्ट किंवा फाॅरवर्ड करावी.     
ँ अफवा, बदनामीकारक मजकुर, धार्मिक तेढ निर्माण करणारे साहीत्य प्रसारित करण्याआधी त्यासंर्दभात कायदे व कलमांअर्तगत तरतुदींचा अभ्यास करा.
ँ माहिती, अफवा किंवा द्वेषपुर्ण मजकुर खरे आहे काय याबाबत गुगल किंवा इतर संर्दभातुन माहिती पडताळुन घ्या.
ँ शक्यतोवर अनावश्यक माहिती मजकुर फाॅर्वड, व्हायरल करणे टाळा. उत्साहाच्या भरात एखाद्या सायबर गुन्ह्यात आपण अडकु शकतो हे लक्षात घ्या. 
ँ सोशल मिडीया हे आवश्यक माहितीच्या आदानप्रदानासाठी आहे. व्देष पसरविण्यासाठी नाही. हे आधी ध्यानात घ्या.
ँ व्हाट्सअॅप, फेसबुकवर येणारी प्रत्येक पोस्ट, मजकुर, व्हीडीओ विश्वासार्ह असतो असे नसते. अफवा, फेक पोस्टमागे एखादी विकृत भावना असु शकते.
ँ सोशल मिडीयावर अफवा, आपत्तीजनक, वादग्रस्त, माहिती व्हायरल करण्याआधी स्वत: ला का?  हा प्रश्न विचारा. दुसऱ्याच्या हाताचे बाहुले खेळणी बनने टाळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.  


कायद्यातील तरतुदी लक्षात घ्या

भारतीय दंड संहीता मधील कलम 153 अ : 
धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादी कारणास्तव निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे, एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती केल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा व दंड होऊ शकते.  
भादंवी कलम 295 अ: 
धार्मिक भावना दुखावणे याकरिता तीन वर्ष शिक्षा व दंड होऊ शकते. 
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000  कलम 66 (फ) प्रमाणे देशाची एकता, सार्वभौमत्व संगणक सामग्रीद्वारे धोक्यात आणली गेल्यास आजीवन कारावास घडु शकतो. 

सायबर साक्षरता काळाची गरज

सायबर विश्वात वावरताना प्रत्येकाने सायबर विश्वासंर्दभात जागरुक राहणे अपरिहार्य बनले आहे. सायबर फिट राहण्यासाठी जनतेने वेगवेगळी आॅनलाईन फ्री कोर्सेस, वर्कशाॅप, सेमिनार, वर्तमानपत्रातीलेख, न्यायलयांचे न्यायनिवाडे इ.साहित्याचे अवलोकन करावे. येणारा काळ लक्षात घेता शिक्षणाच्या  अभ्यासक्रमात सायबर कायदा समाविष्ट होऊ शकतो. त्यामुळे सजग सायबर सेफ सोसायटी निर्माण होण्यास मदत होऊन सायबर गुन्हेगारी निश्चीतच कमी होऊ शकते. 
- आवेज मक्सुद काझी (सायबर तज्ज्ञ तथा पोलीस उपनिरीक्षक, लातुर) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com