सावधान : एटीएमबाबत ओटीपी विचारला तर सांगु नका? काय आहे कारण...

file photo
file photo

नांदेड : पहिल्या काळात चोरी, लुटमारी घरी जाऊन प्रत्यक्षात गुन्हेगार करत होते. आताही करतात पण ते प्रमाण थोड्याफार प्रमाणात सध्या कमी झाले आहे. पण आता ऑनलाइन फ्रॉडद्वारे आपल्या बँक खात्यामधून सायबर क्रिमिनल  रक्कम चोरत आहेत. ऑनलाइन सायबर क्राईम बद्दल आपण ऐकले असेलच किंवा आपल्यापैकी अनेकांना बरोबर अशा प्रकारचे फसवणूक सायबर फ्रॉड झाल असेल...हे सायबर क्रिमीनल आपल्याला बँकेचे अधिकारी वा कर्मचारी म्हणून कॉल करतात वा कोणत्याही प्रतिष्ठित कंपनीचे कर्मचारी आहेत असे भासवतात. आपल्याला CVV किंवा OTP मागतात व तुम्हाला सांगितले जाते की आपल्या एटीएमचा कालावधी संपलेला आहे किंवा आपले एटीएम बंद होणार असे सांगून फसवून आपल्याकडून संबंधित माहिती घेतात.

आपल्याकडे असलेल्या एटीएमच्या कार्ड मागील सोळा डिजिटचे नंबर आहेत. त्यामधील शेवटचे चार नंबर विचारतात किंवा आपल्या मोबाईलवर ओटीपी आला आहे तो ओटीपी सांगा. आपल्या कार्डचे इंटरनेट बँकिंग कंटीन्यू होईल, चालू राहील असे सांगतात. आणि आपण सहज अशा फ्रॉड कॉलवर विश्वास ठेवतो. आज काल आपण सगळ्यांचा असा समज झाला आहे की आता सगळे ऑनलाईन झालेले आहे. आपल्याला बँकेला जाण्याची आवश्यकता नाही. असे समजून आपण संबंधित बँकेच्या खात्याची सर्व माहिती या संबंधित फ्रॉड करणाऱ्या लोकांना नकळतपणे देतो.

लोकांचे बँक खाते सायबर क्रिमीनल साफ करत आहेत

अशाप्रकारे एक नाही दररोज हजारो, लाखो सायबर क्राईम फ्रॉड होत आहेत. आपले सरकार सायबर क्राईमसंबंधी ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीत. ही माझ्या समजण्या पलीकडची बाब आहे तेच ते जुने कायदे असल्यामुळे पोलीस ही हतबल आहेत. लोकांचे बँक खाते सायबर क्रिमीनल साफ करत आहेत. आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. असे नाही का वाटत आपल्याला. या संबंधित Google pay fraud,OLX fraud,upi fraud,fake shopping sites या माध्यमांतून रोज लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. अनेकदा तर fortuner,mahindra suv, BMW आदी लक्झरिअस गाड्या लकी ड्रॉमध्ये लागल्या असे सांगून फसवणूक केली जाते. यासंबंधी जनप्रबोधन जनजागरण महत्त्वाच आहे. सायबर क्रिमिनल्स लोकांना फसवून त्यांची मेहनतीची कमाई लुटत आहेत. आणि आपण त्यांच्या या आमिषाला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेत आहोत.

सायबर क्रिमीनल लवकरात लवकर पकडले जाऊन त्यांना न्यायालयामार्फत कडक शिक्षा व्हावी

यासंबंधी आपल्याकडे सायबर फ्रॉड/क्राईम संबंधी कोणतीही प्रभावी कायदे अस्तित्वात नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारांनी या संबंधी प्रभावी कायदे बनवावे. पोलीस विभागातील सायबर सेलला प्रत्येक जिल्हा स्तरावर खूप जास्त प्रमाणात मजबूत करावे व काही मर्यादित कालावधीमध्ये दाखल झालेला FIR संबंधी तपास करावा. जेणेकरून सायबर क्रिमीनल लवकरात लवकर पकडले जाऊन त्यांना न्यायालयामार्फत कडक शिक्षा व्हावी.
एकीकडे केंद्र शासन डिजिटल करन्सीला महत्व देत आहे. तर त्या संबंधी कायदे ही मजबूत प्रभावी असले पाहिजे नाहीतर तेच आपले जुने IT ACT 2000 66C,66D आणि 420 IPCकायदे लोकांच्या माथाडी मारून द्या. काय होत या कायद्याने सरकारला लवकरच काहीतरी प्रभावी उपायोजना करावे लागणार. रोज नेहमी एका पेक्षा एक मोठे सायबर फ्रॉड गुन्हे होत आहेत. ह्या संबंधात केंद्रशासनाने एक नवीन कायदा करून सायबर फ्रॉडमध्ये लोकांची गेलेली रक्कम ही केंद्र शासनाने संबंधित फिर्यादी व्यक्तीस द्यावी व नंतर ती रक्कम आरोपीकडून वसूल करून घ्यावी सरकारच्या IT ACT 2000 66C,66D आणि 420 IPCने काही साध्य होणार नाही. व प्रत्यक्षात फिर्यादीला याचा काय फायदा होतो हे संशोधनाचा विषय आहे. सायबर क्राईम फ्रॉडसंबंधी कोणताच प्रभावी कायदा अस्तित्वात नाही. लोकांना झालेल्या फ्रॉड संबंधित रक्कम कोण देणार, कसे देणार यासंबंधी काय उपाय आहेत या बाबी स्पष्ट होत नाहीत. 

शब्दांकन- मोहम्मद उस्मान-(सायबर क्राईम अभ्यासक, नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com