esakal | प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्याच्या गृहविभागाने ४१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. हे आदेश गुरुवारी (ता. १७) रात्री उशिरा निर्गमीत केले. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांची बदली केली असून त्यांना सध्या तरी पदस्थापना दिली नाही.

प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात व्यापारी, उद्योगपती, डॉक्टर या बड्या मंडळींना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या कुख्यात रिंदा संधू या टोळीची कंबर तोडणाऱ्या पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची अखेर तेरा महिन्यानंतर बदली झाली आहे. त्यांच्या जागी उल्हासनगर (ठाणे) येथे कार्यरत असलेले व धूळे दंगल शांत करणारे धाडशी पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे येत आहेत. 

राज्याच्या गृहविभागाने ४१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. हे आदेश गुरुवारी (ता. १७) रात्री उशिरा निर्गमीत केले. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांची बदली केली असून त्यांना सध्या तरी पदस्थापना दिली नाही. त्यांच्या ठिकाणी उल्हासनगर येथून पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे येत आहेत. प्रमोद शेवाळे यांनी यापूर्वी राज्याच्या अनेक भागात उत्कृष्ठ सेवा केली आहे.

हेही वाचाअवैध धंद्याचा कर्दनकाळ जयंत मीना- परभणीचे नवे पोलिस अधिक्षक

 गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून प्रमोद शेवाळेंची ओळख

मुळचे नाशिक जिल्ह्यातील प्रमोद शेवाळे हे १९९६ बॅचचे थेट पोलिस उपाधीक्षक आहेत. ते परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे पोलिस सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर वडसा (जिल्हा गडचिरोली) या उपविभागाचे ते उपविभागीय पोलिस अधिकारी झाले. त्यानंतर मालेगाव, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे सेवा दिल्यानंतर पदोन्तीनवर त्यांची दौंड राज्य राखीव बल येथे प्राचार्य म्हणून बदली झाली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून ते धूळे येथे रुजु झाले. त्यावेळी तेथे झालेली दंगल त्यांनी योग्य रित्या हाताळून जिल्हा शांत केला होता. पनवेल (मुंबई) येथे पोलिस उपायुक्त त्यानंतर पुढे अनुसुचीत जाती जमाती विभागाचे ते पोलिस अधीक्षक म्हणून राहिले. राज्य गुप्त वार्तामध्येही कम्युनिटी व नक्षलवाद या विभागात त्यांनी उत्कृष्ट काम केले. सध्या ते उल्हासनगर येथे पोलिस उपायुक्त पदी कार्यरत होते. त्यांच्या कामाची दखल घेतल्याने शासनाने त्यांच्यावर संवेदनशिल असलेल्या नांदेड जिल्हयाची जबाबदारी टाकली आहे. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. 

येथे क्लिक कराVideo - मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही

विजयकुमार मगर यांचा कार्यकाळ 

नांदेडात गेल्या दोन वर्षापासून रिंदा गॅंगची दहशत होती. व्यापारी, डॉक्टर यासह बड्या उद्योगपतींना जीवे मारण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसुल करत होती.तेरा महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे नांदेडला रुजू झाले. यावेळी त्यांच्यासमोर खंडणीखोरांची दहशत शहरात होती. त्यांनी तातडीने पावले उचलत त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत या टोळीमधील जवळपास ६० हून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे. त्यामुळे नांदेडात त्यानंतर खंडणीसाठी होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांना लगाम बसला. गणेशोत्सव, रामनवमी, निवडणुका यासह इतर बंदोबस्ताचे जिल्हा पोलीस दलाने यशस्वीरित्या पार पाडले. यासह विविध समाजहिताचे त्यांनी काम केले.