खबरदार : रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार कराल तर...जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची तंबी  

file photo
file photo

नांदेड : कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ भितीपोटी रेमेडिसिव्हीर इजेंक्शनबाबत ज्यांना आवश्यकता नाही ते सुध्दा यासाठी आग्रह करतांना दिसून येत आहेत. कोविड बाधित रुग्णांच्या प्रकृतीनुसार आरोग्य विभागातर्फे काळजीपूर्वक गरजू असलेल्या बाधितांना रेमेडिसिव्हीर इजेंक्शनचा उपचार केला जात आहेत. मात्र याची मागणी केवळ भितीपोटी मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा तुटवडा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत याच्या प्रभावी नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 आणि भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये रेमडिसिव्हीर इजेंक्शन औषधाचे वितरण व विक्री यातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

1) कोविड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यता प्राप्त असलेले प्रमाणपत्र त्यांचे सलग्न असलेले मेडिकल स्टोअरचे परवाने यांच्यासह घाऊक विक्रेता किंवा सी.ॲन्ड.एफ एजंट यांच्याकडे लेखी मागणी नोंदवावी.

2)  रेमेडिसिव्हीर इजेंक्शनची मागणी करतांना रुग्णालयातील रुग्ण संख्या विचारात घेवून व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडिसिव्हर इजेंक्शनची आवश्यकता आहे, अशी संख्या विचारात घेवून तीन दिवस पुरेल एवढ्या रेमेडिसिव्हीर इजेंक्शनची मागणी नोंदवावी. या औषधाची मागणी नोंदविण्यापुर्वी केंद्र व राज्य शासनाचा कोविड क्लिक मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.

3) घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी.ॲन्ड.एफ  एजंट यांनी रुग्णाची कागदपत्राची योग्य प्रकारे शहानिशा केल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा. त्याबाबतचे लेखी
अभिलेख जतन करावे.

3) औषध दुकानावरुन थेट रेमेडिसिव्हीर औषधाची विक्रीवर बंदी घालण्यात येत असून रेमडिसिव्हर औषधाचा पुरवठा स्टॉकिस्टद्वारा केवळ कोविड हॉस्पिटल, हॉस्पिटलला संलग्न असलेल्या मेडिकल येथे करण्यात यावा.

5) सर्व घाऊक विक्रेत्यांनी किंवा सी.आय.ॲन्ड.एफ  एजंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमेडिसिव्हीर इंजेक्शन माहिती उदा :- कोविड रुग्णालयाचे नाव , संलग्न मेडिकलचे नाव, बिल क्रमांक, दिनांक, एकूण विक्री संख्या इत्यादीबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयास दररोज सादर करावी.

6) ज्या रुग्णालयाच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर नाही त्यांनी स्वत: रेमेडिसिव्हीर इंजेक्शन खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी.आय.ॲन्ड.एफ  एजंट यांच्याकडून करावी. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा. व त्यामध्ये खरेदी केलेला साठा औषधाचे नांव, समुह क्रमांक , औषध पुरवठ्याचा दिनांक, रुग्णाचा तपशिल , पुरविलेले इंजेक्शन, डॉक्टरांचे नाव, आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यायावत ठेवावी. इंजेक्शन खरेदी वापर, विक्री व शिल्लक साठा याचा ताळमेळ ठेवावा.

7) रुग्णालयांनी स्वत: कोविड  रुग्णांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत. रुग्णांच्या नातेवाईकास बाहेरुन घेवून येण्यास सांगू नये.

8) कोविड रुग्णालयांनी रुग्णांना औषधाची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी.

9) कांही कारणाने रेमडिसिव्हर इंजेक्शन या औषधाचा पूर्ण डोस देण्यास आला नाही, तर त्याचा उर्वरित साठा हॉस्पिटल , मेडिकल स्टोअरमध्ये परत करण्यात यावा. व त्यांचा अभिलेख ठेवावे.

10) कोविड रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. रुग्णालयामध्ये गैरप्रकार हाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात गैरप्रकार आढळून आल्यास रुग्णालय व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल.

11) सर्व कोविड रुग्णालयांनी ज्या रुग्णांकरिता रेमडिसिव्हर इंजेक्शन वापरले गेले आहेत. त्या औषधाच्या बाटलीवरील लेबल काढून रुग्णाच्या केस पेपरसोबत लावावेत.

12) सर्व कोविड रुग्णालयाशी संलग्नित असलेले मेडिकल दुकानदारांनी रेमडिसिव्हर औषधाचा काळाबाजार, गैरवापर रोखणे अनुषंगाने सुचनांचे तंतोतंत पालन करावे व परिशिष्ठ ब मध्ये संबंधित रुग्णालयामार्फत माहिती भरुन दिल्याशिवाय रुग्णांना औषध विक्री करु नये.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग  नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंडविधान 1860 चे कलम 188 व औषध व सौंदर्य  प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 प्रमाणे सर्व दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com