सावधान... नांदेडला वाहनांची होतेय चोरी; पोलिसांनी द्यावे लक्ष 

अभय कुळकजाईकर
Saturday, 31 October 2020

कोरोना संसर्ग आणि कडक लॉकडाउनच्या काळात शहरासह जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख खूप कमी झाला होता. त्यानंतर ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाली आणि बाजारपेठेत गजबज सुरू झाली. पूर्वीसारखे सुरळीत होण्यास सुरवात होताच चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. घरफोड्या, मोबाइल पळवणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकाऊन घेणे, लुटमार करणे त्याचबरोबर दुचाकी आणि इतर वाहनांच्या चोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीपासून ते ट्रक चोरण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. 

नांदेड - गेल्या महिन्याभरापासून नांदेड शहर आणि परिसरातून दररोज दोन पाच दुचाकी वाहनांची चोरी होत आहे. त्याचबरोबर ट्रकसह चारचाकी वाहनांच्याही चोरीच्या घटना जिल्हाभरात घडल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यात फक्त त्यांची नोंद होत असून तपासात काहीच प्रगती होत नसल्यामुळे पोलिस नेमके करतात तरी काय? अशी विचारणा होत आहे. त्याचबरोबर ‘चोरीची केवळ नोंद अन् पोलिसांचे झोपेचे सोंग’ असा प्रकार तक्रारदारास पहावयास मिळत आहे. 

कोरोना संसर्ग आणि कडक लॉकडाउनच्या काळात शहरासह जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख खूप कमी झाला होता. त्यानंतर ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाली आणि बाजारपेठेत गजबज सुरू झाली. पूर्वीसारखे सुरळीत होण्यास सुरवात होताच चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. घरफोड्या, मोबाइल पळवणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकाऊन घेणे, लुटमार करणे त्याचबरोबर दुचाकी आणि इतर वाहनांच्या चोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीपासून ते ट्रक चोरण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. 

हेही वाचा - राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन- अशोक चव्हाण

महिन्याभरात दोनशेहून अधिक गुन्हे
गेल्या एका महिन्यात जवळपास दोनशेहून अधिक वाहनचोरीचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. कमी - जास्त फरकाने सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे वाहनचोरांचा सुळसुळाट वाढला आहे. सायकल चोरीच्या बाबतीत तर न बोललेलेच बरे. कारण सायकल चोरीची तक्रारही कोणी देताना किंवा घेताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या वाहनांची पोलिस दफ्तरी नोंद करण्यापलीकडे पोलिसही फारसे प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. पोलिसांनी किती वाहनांचा शोध घेण्यात यश मिळवले हाही संशोधनाचा विषय असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे. 

हेही वाचलेच पाहिजे -  कनेरगाव येथील घरगुती गॅस टाकीच्या स्फोटात चाळीस हजाराचे नुकसान 

विशेष पथकाची गरज 
वाहनचोरीच्या घटना उघडकीस येण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. भरदिवसा वाहने चोरली जात असल्याने वाहन चोरांसमोर पोलिसांची हतबलता स्पष्ट दिसून येत आहे. विशेष म्हणजे पाळत ठेऊन अनेक वाहने अपार्टमेंट, सोसायटीच्या पार्किंगमधून, दुकान, घरासमोरुन चोरीला जात आहेत तर काही वाहने भरदिवसा रस्त्यावरुनही चोरल्याचे प्रकार घडले आहेत. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय असून ही वाहने ग्रामिण भागात किंवा तेलंगणात हैदराबादला नेऊन विकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता दुचाकीचोरी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caution ... vehicle theft in Nanded; The police should pay attention, Nanded news