esakal | शासन नियमांचे पालन करुन भीमजयंती साजरी करा-रिपब्लिकन नेते बापूराव गजभारे

बोलून बातमी शोधा

file photo

संविधानाचे जनक आम्हा कोटी- कोटी जनतेचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी येत आहे.

शासन नियमांचे पालन करुन भीमजयंती साजरी करा-रिपब्लिकन नेते बापूराव गजभारे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना महामारीचा प्रार्दुभाव होऊन हजारो लोक दररोज बाधित होत आहेत. शेकडो लोक मृत्यूमुखी पडून स्मशानभूमीत प्रेतांवर लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नाही. 

अशी भयानक परिस्थिती संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी संविधानाचे जनक आम्हा कोटी- कोटी जनतेचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी येत आहे. ती साजरी करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तथा नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केले आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये तुटवडा नाही, मग मिळत का नाही ? रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी गरजवंताचा सवाल

काही फुटकळ संघटनांचे लोक आंबेडकरी जनतेमध्ये जयंती साजरी करण्यावरुन संभ्रम निर्माण करीत आहेत. प्रशासनासोबत तोंडचोपडे धोरण आणि समाजात भडक वक्तव्य अशी नाटकी भूमिका घेत आहेत. अशा कोणत्याही अपप्रचार करणाऱ्या प्रवृत्तीकडे लक्ष न देता शासन नियमांचे तंतोतंत पालन करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी. आंबेडकरी समाज हा परिस्थितीचे भान ठेवून जागरुकपणे वागणारा समाज आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी दिला आहे तो यावेळेसही द्यावा, असे आवाहन गजभारे यांनी केले आहे.