केंद्र सरकारचा सायबर स्ट्राईक- मनोज पुरोहीत

file photo
file photo

नांदेड : भारत सरकारने अधिक सखोल अभ्यासानंतर 118 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण असे म्हटले आहे की या अॅप्समुळे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारत संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला पूर्वग्रह असण्याची शक्यता तर होतीच पण या अॅप्समधून वापरकर्त्यांना सुध्दा धोका होता.

बॅन केलेल्या मोबाइल अ‍ॅपमध्ये आनंदाची बातमी अशी आहे की, अनेक गेम्स ज्यामधून नवयुवक, तथा अगदी सातवी ते बारावी इयत्तेत शिकणारी मुलं ज्या गेमच्या अत्याधिक वापरांमुळे वेडे होण्याच्या, मनोविकाराने ग्रस्त होण्याच्या पातळीला पोहचली होती. अशा गेम्सना उदाहरणार्थ पब्जी, पब्जी लाईट याशिवाय पार्टी देण्या- घेण्याच्या अटीवर तरुणांकडून मॉल्सच्या रस्त्यावर, मॉल्सच्या काठावर, अ‍ॅप्स लुडो ऑल स्टारसारखे गेम खेळले जातात.

हा नवीन भारत आहे

अतिक्रमण आणि घुसखोरीसाठी चीनने प्रयत्न केलेल्या भारत आणि चीनच्या सीमांवर आज भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा नवीन भारत आहे, हा जोश जबरदस्त आहे. आम्हांला ठाऊक आहे की, आपल्याबरोबर अशी एक पिढी असू शकते, ज्या पिढीने 1962 च्या युद्धात चिनच्या पराभवामुळे दुखी झाले असावेत किंवा त्यांनी आजन्म भारत चीनद्वारे पराभूत झाला अशी भावना कायम आपल्या मनांत बाळगली असावी. मी सुध्दा भारतापुढे चीन बलाढ्य आहे आणि चीनने आम्हांला 1962 च्या युध्दात हरवले आहे. ही भावनाच घेउन जगलो आहे. मात्र आता माझ्यामधीलच नव्हे तर आजच्या तरूणांसाठी ही अभिमानाची बाब आहे, जेव्हा सीमेवरील सैनिकांच्या या पराक्रमाची मला आणि तमाम जनतेला माहिती मिळाली. सैनिकांच्या ह्या शौर्याने आमचे मनोबल उंचावले तर आहेच पण आम्हांला अभिमानास्पद असे त्यांचे हे शौर्य आहे हे सुध्दा तितकेच खरे.

हे सिमेवरील चित्र समजलेच आहे...

मात्र आंतरराष्ट्रीय राजकीय पातळीवर चीनचे अनेक अॅप्स बंद करून आज पुन्हा भारताने चिनच्या भारतविरोधी कारवाईला जबरदस्त धक्का दिला आहे. हा भारत आहे, ज्याला जशे समजते त्याला त्याच्या भाषेत उत्तर देण्यास आम्ही मागेपुढे पाहत नाही हेच आजच्या कारवाईतून स्पष्ट दिसून आले आहे. आज आम्ही केवळ 118 अ‍ॅप्सना भारतात वापरण्यास बंदी घातली आहे, ज्यात बायडू, अलिपे, वुईचॅट आदी अॅप्स समाविष्ट आहेत. अ‍ॅप्स बंद करून काय कमावले किंवा गमावले हे महत्वाचे नाही? महत्वाचे हे आहे की हे सरकार निर्णय घेणे व त्यावर अंमलबजावणी करणे जाणते.

 गेम मोबाइलवर किंवा टॅबवर खेळायचे

आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असे काही अॅप, ज्याचे आमचे तरुण ईतके व्यसनाधीन झाले होते की ते रात्रभर जागे राहून सदरील गेम मोबाइलवर किंवा टॅबवर खेळायचे. अशा मुलांनी स्वतः च्या पालकांकडे, त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यांनी पालकांना उध्दट, उलट उत्तर देणे सुरू केले. घरात झोपलेला असतांना ही मुलं झोपेत ओरडायची, किंचाळायची आणि पालक धास्तावून त्यांना आणखी सदरील गेम खेळण्यापासून परावृत्त करायला घाबरायचा. कित्येकदा तर खेळण्यात व्यस्त असताना ही मुलं रात्रीच्या वेळी आपल्या खोलीतून असे ओरडायचे की जणू खरोखर आग लागली असेल किंवा चोर आला असावा. आणि साधा दिसणारा खेळ खेळता खेळता आपला मुलगा ह्या गेमच्या आहारी गेलाय हे पालकांना कळायचे सुध्दा नाही. माझ्या माहितीनुसार, नांदेड सारख्या शहरामधून, खेळाच्या व्यसनाधीनतेमुळे या खेळाच्या आयोजकांना किमान मोठी कमाई होत असावी. आज बरेच पालक शांतपणे झोपू शकतील, आपल्या मुलाला ह्या गेमच्या व्यसनापासून ते दूर करू शकत नाहीत मात्र सरकारच्या एका निर्णयाने आपल्या मुलाला ह्या गेमपासून दूर नेण्यास मदत केल्याबद्दल ते सरकारचे आभार मानतील असे वाटते.

सरकारने अशा सगळ्या पळवाटांना बंद करावे 

तसे असले तरी अनेक कंपन्या आता पुन्हा त्यांच्या विपीएन सेवांच्या जाहिराती करून मुलांना ह्या खेळांस खेळण्यासाठी उद्युक्त करु शकतात असे वाटत आहे. त्यामुळे आपल्या सरकारने अशा सगळ्या पळवाटांना बंद करावे अशी एक विनंती सरकारला करण्याची माझी ईच्छा आहे. कारण ह्या निर्णयातून आपण आपल्या भावी पिढीला वाचविण्याचे एक महत्कार्य केले आहे असे मला वाटते. ह्या कार्यासाठी लहानमुलांना माहिती देणारे दूत म्हणून पुरस्कारसुध्दा देऊन सरकार गौरवू शकते.

सुमारे २२५ अॅप्सवर बंदी घालून सरकारने हा स्पष्ट संदेशच दिला 

तसे असले तरी, मला वाटते आपण सर्वांनी मिळून सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत करणे गरजेचे आहे. एकूणच, सुमारे २२५ अॅप्सवर बंदी घालून सरकारने हा स्पष्ट संदेशच दिला आहे की ते कोणत्याही प्रकारे झुकण्याऐवजी झुकविण्यासाठी तत्पर आहेत ते. अॅप तयार करणाऱ्या कंपन्या जाणते-अजाणतेपणांत मोबाईल वापरणाऱ्यांचा महत्वाचा डाटा चोरत होते. आपल्याकडे नाही म्हणायला मोबाईल धारकांची संख्या अगदी झपाट्याने वाढलीय. मात्र मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्या गेलेल्या अॅप्स जेव्हां आपल्याला परवानगी मागतात तेव्हां त्यांना स्विकार करण्यापलिकडे आपण कसलाच विचार करत नाही. याला कारण आपल्याकडील शिक्षण सुध्दा आहे. आपल्याकडे मोबाईल विकत घेणे शक्य आहे मात्र त्यावरील इंग्रजीच्या प्रश्नावलीला अनेक लोकं आधी पहिला पर्याय निवडतात नाही चालले तर दुसरा निवडतात मात्र त्या पर्यायांचा अर्थ ते दुसऱ्याला विचारायला लाजतात हे सुध्दा तितकेच खरे आहे. आणि ही बाब अगदी सुशिक्षीत मोबाईल धारकांच्या बाबतीत ही खरी आहे. अनेक ठिकाणी मुलांच्या हातात मोबाईल दिल्यामुळे वापरकर्ता अशा चुकांना बळी पडतो.

राजकीय आघाडीवरच नव्हे तर आर्थिक आघाडीवर 

अशा परिस्थितीत आणखी 118 मोबाईल अॅप्स वर, विशेष करुन चायनीज अॅपवर बंदी येणे हे खरोखर देश व देशाच्या नागरीकांच्या दृष्टीनं एक स्वागतार्ह निर्णय आहे. चिनला त्याची ही कुरघोडी करण्याची सवय सोडावी लागेल अन्यथा त्याला केवळ राजकीय आघाडीवरच नव्हे तर आर्थिक आघाडीवर आणि आंतरराष्ट्रीय आघाडीवर तसेच आंतरराष्ट्रीय सिमा आघाडीवरही धोबीपछाड देण्यात येईल असे चित्र दिसून येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com