
बिलोली : शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या घरकुलधारकांची दिशाभूल करून त्यांच्याकडे अनावश्यकरीत्या पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. घरकुल लाभधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे नियमानुसार त्यांच्या खात्यावर जमा केले जातात, त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता घरकुलधारकांनी कुणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले.