esakal | कामचुकार ३३ विस्तार अधिकाऱ्यांना सीईओंचा दणका, काय आहे प्रकरण?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एवढेच नाही तर त्याचे नियोजन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ३३ विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

कामचुकार ३३ विस्तार अधिकाऱ्यांना सीईओंचा दणका, काय आहे प्रकरण?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला 57 कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा योग्य असा गावविकासासाठी वापर करण्यात आला नाही. एवढेच नाही तर त्याचे नियोजन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ३३ विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसांचे वेळेत उत्तर आले तर ठिक नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सांगितले आहे. 

विस्तार अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सूचना देऊनही वित्त आयोगास संदर्भात सुधारित आराखडा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मुदतीत खुलासे प्राप्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्र शासनाच्या 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील पंचायत संस्थांच्या बळकटीकरणासाठी निधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती पाच कोटी 71 लाख 36 हजार रुपये करण्यात आला आहे. 

हेही वाचा -  इसापूर धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्याच्या पुढे पैनगंगा नदीला पूर- सावधानतेचा ईशारा

‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रम

पंधराव्या आयोगाच्या आदेशानुसार ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रम ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून त्यानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करायची आहे. यासाठी पंचायत समितीमार्फत अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र यात खेडे तसेच इतर अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोंडेकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत या नोटीस बजावली आहे.

हे आहेत नोटीस बजावलेले विस्तार अधिकारी 

व्ही. एम. मुंडकर (अर्धापूर), डी. व्ही. जोगपेठे (माहूर), एन. एम. मुकनर (उमरी), एस. एम. ढवळे, बी. एम. कोठेवाड, टी. टी. गुट्टे (कंधार), एस. आर. शिंदे, डी. एल. उडतेवार, के. व्ही. रेणेवाड, एस. जी. चिंतावार, डी. व्ही. सूर्यवंशी, ए. व्ही. देशमुख, एस. एन. कानडे, आर. डी. जाधव, संजय मिरजकर, डी. एस. बच्चेवार, जे. एस. कांबळे, एस. आर. कांबळे, शेख म. लतीफ, पी. आर. मुसळे, पी. एस. जाधव, व्ही. बी. कांबळे, एस. व्ही. येवते, जी. एन. गरजे, के. एस. गायकवाड, डी. पी.  धर्मेकर, एस. टी. शेटवाड, आर. पी. भोसीतकर, पी. जे. टारफे, आर. एम. लोखंडे, पी. के. सोनटक्के, आर. डी. क्षिरसागर आणि डी. आय गायकवाड.
 

loading image
go to top