नांदेडकरांना समजावण्यासाठी सनदी अधिकारी उतरले रस्त्यावर

Nanded News
Nanded News

नांदेड ः कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेमध्ये नांदेड जिल्ह्यातील बाधीत रुग्णांचा आकडा ६०० पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड निवयमावलींचे पालन करावे, म्हणून सनदी अधिकारी शनिवारी (ता.२० मार्च) रस्त्यावर ऊतरले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा त्यात समावेश होता.

राज्यात शुक्रवारी आत्तापर्यंतचा उच्चांकी २५ हजार ६८१ रुग्णांची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ६९७ रुग्णांची नोंद झाल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कोविड नियमावलींच्या पालनासाठी कठोर अमलबजावणीचे आदेश दिले आहेत. परंतु, नांदेडकर काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे नाईलाजाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनाच रस्त्यावर उतरावे लागले. शनिवारी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने या सनदी अधिकाऱ्यांसोबतच आमदार बालाजी कल्याणकरही रस्त्यावर उतरून नागरिकांना कोविड नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना करत होते.

महापालिकेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्यांची जागेवरच अॅंटीजन तपासणी करण्यासाठी मनपाचे मुख्य निर्धारक व करसंकलन अधिकारी अजितपालसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी सुरेशसिंह बिसेन, सहाय्यक आयुक्त राजेश चव्हाण, सुधीर इंगोले, अग्नीशमन प्रमुख रईस पाशा, कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

नांदेडकरांनी शासनाने दिलेल्या कोविड नियमावलींचे काटेकोर पालन करावे. अन्यथा जिल्ह्यात नाविलाजाने कडक लॉकडावून करावे लागेल.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नांदेड

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com