esakal | कोरोना संकटात नांदेडची आरोग्य यंत्रणा प्रभारीच्या खांद्यावर; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज

बोलून बातमी शोधा

health

कोरोना संकटात नांदेडची आरोग्य यंत्रणा प्रभारीच्या खांद्यावर; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या कोरोनाचा कहर संबंध देशातच नव्हे तर जगभरात सुरु आहे. या संसर्गाच्या कचाट्यात नांदेड जिल्हाही होरपळून निघत आहे. वाढती रुग्णसंख्या व मृत्यूचा आकडा डोळे दिपवणारा ठरत आहे. दररोज कोरोना बाधीतांची संख्या व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील नांदेडकरांचा विश्वास उडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे नांदेडची आरोग्य यंत्रणा सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती असल्याने त्यांनाही आपल्या अधिकाराचा पुर्ण वापर करता येत नसल्याने रुग्णालय यंत्रणेवर पाहिजे अशा वचक बसविता येत नाही. त्याचा परिणाम असा की रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविणे आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे बोलल्या जाते. कोरोनाच्या या महासंकटात येथे पुर्ण वेळ जिल्हा शिल्य चिकित्सक असायला पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून एक जबाबदार वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी नियुक्त करावा असी मागणी नांदेडकरांमधून पुढे येत आहे.

नांदेडची आरोग्य यंत्रणा अगोदरच खिळखिळी झाल्याचे पहावयास मिळते. तालुकास्तरावर प्राथमीक रुग्णालयाला चांगल्या इमारती नसून त्याठिकाणी अत्यावश्यक यंत्रसामुग्री नाही. त्यातच ग्रामिण भागात तज्ज्ञ डाॅक्टरची वाणवा आहे. अनेक रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व त्यांचे सहकारी हे मुख्यालयी राहत नसून जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये- जा करतात. त्यामुळे अगोदरच ग्रामिण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा वेळेत मिळत नाही. अनेकांना तर उपचार वेळेत न मिळाल्याने प्राण गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. रुग्णवाहिकांचेही वांधे, कधी तिला टायर नाही तर कधी डिझेलअभावी उभी असते. रुग्णांना ने आण करण्यासाठी सोय नाही. अनेक रुग्णवाहिका ह्या बंद अवस्थेत पडून आहेत.

नांदेड जिल्हा हा राजकियदृष्या महत्वाचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. या ठिकाणी वैद्यकिय सुविधा चांगल्या आहेत. मात्र त्या राबविण्यासाठी पूर्ण वेळ जिल्हा शल्यचिकित्सक लागतो. आणि नेमके तेच झाले. या ठिकाणी पूर्णवेळ जिल्हा शल्य चिकित्सक नाही. प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावरुन कोरोनाचे महासंकट केस पेलणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन हे पहिल्या लाटेपासूनच कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रय्तन करत आहेत. मात्र अद्याप त्यावर नियंत्रण मिळाले नाही. नांदेडला पुर्णवेळ जिल्हा शल्य चिकित्सक नेमावा अशी मागणी यापूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांना केली होती. परंतु त्यांची मागणी लालफितीत अडकली. आरोग्य यंत्रणा जरी भविष्यातही प्रभारीच्या हाती राहिली तर कोरोनाचे युध्द जिल्हा प्रशासन कसे जिंकेल असा प्रश्न नांदेडकरांमधून उपस्थित होत आहे. या गंभीर बाबीकडे पालकमंत्र्यासह खासदार, आमदार यांनी लक्ष घालावे असे बोलल्या जात आहे.