नांदेड : बालकांना होतेय गॅस्ट्रोची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children get gastroenteriti

नांदेड : बालकांना होतेय गॅस्ट्रोची लागण

नांदेड : लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने व त्यातच दूषित पाण्यापासून तयार होणारा बर्फाचा गोळा खाल्याने मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये गॅस्ट्रोसारख्या आजाराच्या तक्रारी वाढल्या असून, यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘गॅस्ट्रोएन्ट्रायटिस’होण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्मजंतू दूषित अन्न, पाणी आणि व्यक्ती-व्यक्तीच्या संपर्काद्वारे सहज पसरतात. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे ५ वर्षांखालील आणि विशेषतः सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ‘गॅस्ट्रोएन्ट्रायटिस’रोगाचा जास्त धोका असतो. ओटीपोटात वेदना, उलट्या, सैल हालचाली, ताप, भूक न लागणे, सूजलेले सूजलेले डोळे, सूस्तपणा, मलमध्ये रक्त आणि लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पार चांगलाच चढत आहे. त्यामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळे पालकांनी लहान बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असा तज्ञ डॉक्टरांकडून पालकांना सल्ला दिला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे.

उन्हाच्या उकाड्यापासून बचाव व्हावा म्हणून अनेक मुले पालकांची नजर चुकवून बर्फाचे थंड पाणी पितात. त्यामुळे बर्फाचे पाणी पिल्यानंतर काही वेळासाठी थंडावा जरुर मिळतो. मात्र त्यानंतर गळा बसणे, किंवा बर्फ शुद्ध पाण्यापासून तयार केलेला नसल्यास गॅस्ट्रोसारखा आजार होऊन मुले आजारी पडत आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने मुलांची भुक मंदावणे, जेवणाकडे दूर्लक्ष करणे व उन्हात जास्तवेळ फिरल्याने शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मुलांमध्ये डिहाड्रेशनचे होऊन चक्कर, उलट्या, मळमळ आणि संडास लागण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे.

शाळा शेवटच्या टप्यात

सध्या बारावी - बारावीच्या परिक्षा असल्याने लहान मुलांच्या शाळा आॅनलाइन आणि आॅफलाइन आशा दोन्ही पद्धतीने सुरु आहेत. मात्र एप्रिल महिण्याच्या पहिल्याच आठवड्यापासून लहान मुलांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तेव्हा पालकांना मुलांची अधिकच काळजी घ्यावी लागणार आहे.

उन्हाळा असला तरी, हवामानात सतत बदल होत आहेत. थंडीनंतर कडक उन्हाळा सुरु झाला आहे. तेव्हा मुलांच्या आहरात देखील योग्य तो बदल करावा लागतो. घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बॉटल असावी, उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्री असेल तर उत्तम, शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

- डॉ. राजेश चव्हाण.

Web Title: Children Get Gastroenteriti Foods Made Contaminated Water Parent Prevent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top