सर्दी, खोकला, तापाने उडविली नागरिकांची झोप 

File photo
File photo
Updated on

नांदेड ः जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनाचा उद्रेक वाढल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना तीन ते चार दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाला. या बदलाने सर्दी, खोकला, डोकेदुकीसह व्हायरल फिव्हरने अनेकांची झोप उडविली आहे. 

हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाने नागरिक हैराण झालेले असून, कोरोनाच्या धास्तीने अनेकजण घरगुती उपचार करून प्रकृती जपत आहेत. तर काहीजण आपल्या परिसरातील दवाखान्यात जावून उपचार घेत आहेत. परिणामी औषध दुकानांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. 

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कोरोनाची संख्या घटल्याने कोरोनाचे नियम पाळून जानेवारीमध्ये शाळा, महाविद्यालये नियमित सुरु झाली होती. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. दरम्यान कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या चार ते पाच दिवसांपासून पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे अनेकांच्या मनात भिती आहे. त्यामुळे रुग्णालयात जावून तापासणीकडे अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. 

मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, पहाटे गारठा तर दुपारी कडक ऊन असा वातावरणातील बदलाच्या प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक घरगुती उपचार करून आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्यांनी उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. 

येथे क्लिक कराच - कोरोना नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यात अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून काय सुरु काय बंद राहणार ?
  
उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा 
उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. पाणी उकळूनच प्यावे. घरातील परिसर कोरडा ठेवावा. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्वच्छता राखा. लक्षणे आढळताच डाॅक्टरांना दाखवा. रुग्णांनी अंगावर आजार काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दुषित पाणी पिल्याने पोटाचे विकार उद्भवतात. खाद्यपदार्थांवर बसणाऱ्या माशांमुळे पोटाच्या विकाराचा जास्त धोका उद्भवतो. त्यामुळे घरात स्वच्छता पाळून दुषित पाणी पिणे टाळणे गरजेचे आहे. 

वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फिव्हरचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा. सुदृढ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. पाणी उकळून प्यावे. अंगावर आजार न काढता त्वरीत रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावेत. 
- डॉ. अमोल देशपांडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com