esakal | सोमवारी नांदेड हजार पार; दहा जणांचा मृत्यू, नांदेडकरांनो लॉकडाउनपूर्वीच सावध होण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

सोमवारी (ता. २२) यामधील पाच हजार ९१ अहवाल प्राप्त झाले. यात तीन हजार ३९० निगेटिव्ह, एक हजार २९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३३ हजार सात इतकी झाली

सोमवारी नांदेड हजार पार; दहा जणांचा मृत्यू, नांदेडकरांनो लॉकडाउनपूर्वीच सावध होण्याची गरज

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - नवीन वर्षातील मार्च महिना हा सर्वात धोकादायक महिना म्हणून गणला जात आहे. सोमवारी (ता.२२) प्राप्त झालेल्या अहवालात नवीन वर्षातील सर्वाधिक दहा बाधितांचा मृत्यू आणि एक हजार २९१ अशा सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा स्फोट झाला आहे. त्यामुळे लॉकडाउनपूर्वीच नांदेडकरांना सावधान होण्याची गरज आहे. 

रविवारी (ता.२१) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सोमवारी (ता. २२) यामधील पाच हजार ९१ अहवाल प्राप्त झाले. यात तीन हजार ३९० निगेटिव्ह, एक हजार २९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३३ हजार सात इतकी झाली आहे. 

हेही वाचा- नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली; आयजीनी लक्ष देण्याची गरज

जिल्हाभरातील एकूण ६८५ बाधितांचा मृत्यू 

सोमवारी चैतन्यनगर नांदेड महिला (वय ५४), शिवाजीनगर नांदेड पुरुष (वय ५३), आंबा नगर नांदेड महिला (वय ७०) या तीन रुग्णांवर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात, राजनगर नांदेड पुरुष (वय ६४), नांदेड पुरुष (वय ७०), भाग्यनगर नांदेड महिला (वय ४७), यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर, सोमेश कॉलनी नांदेड पुरुष (वय ९०), शिवाजीनगर नांदेड पुरुष (वय ५०), चैतन्यनगर नांदेड पुरुष (वय ६८), नांदेड महिला (वय ८०) या चार बाधितांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असलेल्या वरील दहा बाधितांचा सोमवारी (ता.२२) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्हाभरातील एकूण ६८५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- अर्धापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दारु विक्रेते व हाॅटेल चालकांकडून दंड वसूल

५९ बाधितांची प्रकृती गंभीर 

सोमवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ९०७, नांदेड ग्रामीण - ३६, भोकर - २२, देगलूर -४२, हदगाव - पाच, कंधार - आठ, ७०, नायगाव - १६, धर्माबाद - २४, मुदखेड -७०, बिलोली - पाच, हिमायतनगर - १४, किनवट- २९, उमरी -१३, माहूर - १६, मुखेड - दोन, परभणी - सहा, हिंगोली- दोन, यवतमाळ - एक, लातूर दोन, आदिलाबाद - तीन असे एक हजार २९१ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३३ हजार तीन इतकी झाली असून, सध्या सहा हजार २६४ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५९ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३२९ स्वॅबची चाचणी सुरु होती. 

नांदेड जिल्हा कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - ३१ हजार सात 
एकूण कोरोनामुक्त - २५ हजार ८५५ 
एकूण मृत्यू - ६५८ 
सोमवारी पॉझिटिव्ह - एक हजार २९१ 
सोमवारी कोरोनामुक्त - ३९२ 
सोमारी मृत्यू - दहा 
उपचार सुरु - सहा हजार २६४ 
गंभीर रुग्ण - ५९ 
स्वॅब प्रलंबित - ३२९ 
 

loading image