

Nanded Ardhapur highway accident protest
sakal
अर्धापूर : नांदेड ते अर्धापूर या मार्गावर वाहने चालविणे हे प्राणघातक ठरत आहे.या मार्गावर होणाऱ्या आपघांच्या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दाभडच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी बुधवारी (ता ११) सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१वर दाभड परिसरात चक्क जाम आंदोलन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.या आंदोलनामुळे या मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी भूयारी मार्गाच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.या आंदोलनात महिलांचा सहभाग खूप मोठा होता.तर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या.