नांदेड : पाचवी ते आठवीचे वर्ग जिल्ह्यात आजपासून सुरू

पहिली ते चौथीचे वर्ग सात फेब्रुवारीपासून
Classes 5 to 8 school starting from today nanded
Classes 5 to 8 school starting from today nandedsakal

नांदेड : कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे तसेच पालकांची सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पाचवी ते आठवीचे वर्ग सोमवारपासून (ता.३१) सुरु होत आहे. तसेच इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सात फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.

Classes 5 to 8 school starting from today nanded
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. परंतु, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. परंतु, पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. परिणामी, विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जात होते. गत दोन वर्षांपासून आॅनलाईन शिक्षणाला विद्यार्थी आता कंटाळले असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती पालक तसेच शिक्षण तज्ज्ञांमधून होत होती.

Classes 5 to 8 school starting from today nanded
"राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"

नांदेड जिल्ह्यातील सर्वच पालक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक तसेच संस्थाचालकांच्या पहिली ते आठवीचेही वर्ग आॅफलाईन सुरु करण्याच्या मागणीनुसार कोरोना नियमावलीचे पालन करून जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सोमवारपासून तर पहिली ते चौथीचे वर्ग सात फेब्रुवारीपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. तसे आदेशही शनिवारी (ता.२९) रात्री उशीरा काढले आहेत.

नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा सोमवारपासून सुरु होत असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक असणार आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचेही शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणे अनिवार्य असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com