नांदेड शहरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले

शहरात असंख्य भागामध्ये साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे
nanded
nandednanded

नांदेड: गत तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे शहर व परिसरात साथीचे आजार वाढले आहेत. कोरोनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात असंख्य भागामध्ये साफसफाईचा बोजवारा उडाला असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तसेच नाल्या तुंबल्या, रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचेही डबके साचले आहेत, नाल्या तंबुल्याने त्यातील पाणीही रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सध्या सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण घरोघरी असून, काही रुग्णालयात जात आहेत, तर काही कोरोनाच्या धास्तीने घरगुती उपचार घेत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.ढगाळ वातावरणामुळे व्हायरल फिव्हरसह सर्दी, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत. बालके आणि ज्येष्ठ नागरिक या आजाराने त्रस्त झाले आहेत.

अशी घ्यावी काळजी

  • शुद्ध पाणी, ताजा आहार आणि स्वच्छता बाळगावी

  • सौम्य सर्दीची लक्षणे जाणवत असल्यास कोमट पाणी प्यावे.

  • मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

  • हळद टाकून दूध प्यावे तसेच गरम वाफ घ्यावी.

  • थंडगार पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

  • पाणी उकळून थंड करून घ्यावे.

  • डासोत्पत्ती वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

  • पाण्याची भांडी झाकून ठेवावी.

  • फ्रीजमागील पाणी काढावे. कुठलीही लक्षणे दिसून येताच उपचार घ्यावे.

  • पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

nanded
सहा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव ओसरला; बीड, उस्मानाबादमधील वाढ चिंताजनक

बहुतांश बालकात सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, तापाची लक्षणे आहेत. यात १५ वर्षाच्या आतील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. ६० वर्षे पुर्ण केलेल्या नागरिकांना अंगदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अविनाश कुलकर्णी (निवृत्त वैद्यकिय अधिकारी, नांदेड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com