esakal | कोविड हॉस्पिटलच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी इटनकर यांनी घेतला आढावा

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी विपीन
कोविड हॉस्पिटलच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी इटनकर यांनी घेतला आढावा
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शासकीय कोविड केअर सेंटर येथे जाऊन आॅक्सीजन प्लॅन्ट आणि रुग्णालयाच्या सुरक्षिततेसंबंधी आढावा घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांना योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेल्या ऑक्सीजन टँकची त्यांनी स्वतः पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे व इतर अधिकारी होते.

जिल्हा रुग्णालय येथील कोविड बाधित पेशंटची संख्या व ऑक्सिजनची निकड लक्षात घेऊन या ठिकाणी नव्याने वीस टन क्षमतेच्या आॕक्सीजन टॅंक उभारणीच्या कामाचा आढावा घेतला.

हेही वाचा - नांदेड : लॉयन्स क्लब व अन्नपूर्णाच्या वतीने अनेकांची रामनवमी गोड

ता. 20 एप्रिलपासून अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात ता. 14 एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. या आदेशात पूर्वी दिलेला सकाळी 8 ते 1 या वेळेत बदल करण्यात आला असून हा कालावधी आता कमी केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता मंगळवार ता. 20 एप्रिलपासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व खाद्य पदार्थाचे प्रकार ( चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी इ.) कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादन, पाळीव प्राण्यांच्य अन्न पदार्थाची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाशी निगडीत व्यक्तींसाठी तसेच संस्थासाठी देखील साहित्य मिळणारी दुकाने या आस्थापना सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहतील.

या दुकानातून घरपोच सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे. सदर आदेशाची अंमलबजावनी 20 एप्रिलचे रात्री 8 वाजेपासून ते ता. 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.