esakal | नांदेड : लॉयन्स क्लब व अन्नपूर्णाच्या वतीने अनेकांची रामनवमी गोड

बोलून बातमी शोधा

शिरापूरीने रामनवमी साजरी
नांदेड : लॉयन्स क्लब व अन्नपूर्णाच्या वतीने अनेकांची रामनवमी गोड
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ता. 15 एप्रिलपासून दररोज तीनशे डबे गरजूंना वितरित करण्यात येत असून राम नवमीचे औचित्य साधून बुधवारी (ता. २१) लॉयन्सच्या डब्यामध्ये शिरा- पुरी देऊन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या- वेगळ्या पद्धतीने गरजूंचा रामनवमी हा उत्सव साजरा करण्यात आला.

शंभर टक्के लोकसहभागातून सुरु असलेल्या या उपक्रमाला अनेकांनी सहकार्य केले आहे. वास्तविक दररोज ३०० डबे देण्याचा संकल्प लॉयन्स परिवाराने केला होता. पण रामनवमी असल्यामुळे अनेक दात्यांनी त्यांच्यातर्फे डबे देण्याचा आग्रह धरल्यामुळे रामनवमीला तीनशे ऐवजी ५०० शिरापुरीचे डबे प्रोजेक्ट चेअरमन राजेशसिंह ठाकूर व मन्मथ स्वामी यांनी वितरित केले. तीनशे डबे रेल्वे स्टेशनवरील प्रवासी तसेच रस्त्यावरील निराधार यांना वाटप करण्यात आले. उर्वरित दोनशे डबे कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी तसेच कोरोना योद्धा असलेले माध्यम प्रतिनिधी यांना वितरित करण्यात आले.

हेही वाचा - शिवभोजन थाळीचा गोरगरीबांना आधार; दररोज अडीच हजार गरजुना लाभ

लॉयन्सच्या डब्यासाठीसाठी नवीन नोंदणी करणाऱ्यांमध्ये

ॲड. बी. एच. निरणे परिवारातर्फे तसेच स्वाती राहुल सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी तीनशे डबे तर निशिकांत उत्तमराव देशमुख परभणी यांनी दोनशे डबे दिले आहेत. सुरज बंकटलालजी राठी यांनी दीडशे डब्यासाठी तर देविदास रामजी राजेवाड सन्मित्रनगर यांनी सत्तर डब्यासाठी योगदान दिले आहे. प्रत्येकी शंभर डबे देणाऱ्या नवीन अन्नदात्यांमध्ये मध्ये डॉ. राजेंद्र मुंदडा, दिलीप उत्तरवार भोकर, संजय दि. पवार, प्रवीण लड्डा, एस. आर. पाटील, मारुती कदम सोनखेड, कै. गंगाबाई नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ पवन जाधव, मोहित जयप्रकाश सोनी, कै. निर्मला गोकुळादास मामोडे संभाजीनगर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, शिल्पकार गुरुवर्य सोपान शूर माळाकोळीकर यांच्या स्मरणार्थ, प्रकाश किशनराव पवार यांचा समावेश आहे.

हे आहेत दाते

याशिवाय माधवराव फुलारी कंधार, कै. रतन पेंटर जैन यांच्या स्मरणार्थ, कै. दुर्गाप्रसाद गणेशलाल सारडा मालेगाव याच्या सन्मानार्थ संजय दिनेश सारडा आणि कै. गणेशसिंह घुडूसिंह ठाकुर यांच्या स्मरणार्थ अर्जुनसिंग ठाकूर, कै. नलिनी दत्तात्रय जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुपाली बालाजी कवानकर यांच्यातर्फे गोडजेवण, नारायण देवराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किशन नारायण देवराज तसेच दुगमवार व्यंकटरामन तलाठी देगलूर, धनंजय साले, राजेश गवळी,

मदन व्यंकटराव बैस कोलंबी, संध्या राजेंद्र शिंदे पारसनगर, मल्हार माटे यांच्या वाढदिवसानिमित्त बालाप्रसाद लक्ष्मणराव माटे, शिवऐक्य पार्वतीबाई मनोहर स्वामी, रा. आखाडा बाळापूर यांचे स्मरणार्थ तर्फे विश्वनाथ मनोहर स्वामी, वामनराव हुगेवार आनंदनगर, कै. विठ्ठल बाबुराव गो. कवटेकवार यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश कवटेकवार, शिवाजीनगर यांच्यातर्फे गोड जेवण, कै. बळीराम बाळकृष्ण रेखावार व कै. शारदा बळीराम रेखावार यांच्या स्मरणार्थ, संजय कलकोटे यांनी प्रत्येकी पन्नास डबे दिले आहेत. उद्योजक आशिष काबरा यांच्यातर्फे आतापर्यंत दोन हजार सॅनिटायझर वितरित करण्यात आले. तसेच स्व. भारतसिंह प्रतापसिंह ठाकूर, बारड यांच्या स्मरणार्थ १११ डबे, कै. दिपकराव यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ प्रेम दीपकराव चव्हाण यांच्या तर्फे ६० डबे, कै. लक्ष्मीबाई गंगाधरराव दुडके यांच्या स्मरणार्थ कैलास गंगाधरराव दुडके पालदेवारनगर चैतन्यनगर यांचे कडून ५१ डब्याची नोंदणी करण्यात आली आहे. हनुमान जयंतीला सुद्धा खिरपुरी देण्याचा मानस लॉयन्स परिवाराने केला आहे.