दिलासादायक, तेवीस पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

शुक्रवारी रात्री उशिराने ८७ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता.२०) सकाळी १८ आणि दुपारी ५८ असे एकुण ७६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालात राजनगर, पिरबुऱ्हाणनगर, रहेमतनगर आणि भगतसिंग रोड या परिसरातील अनुक्रमे ३८, ६२, ४८, व ५५ वर्षाच्या चार रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड : शनिवारी (ता. २०) पंजाब भवन कोविड केअरसेंटर व मुखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्यापैकी पंजाब भवनातील कोविड केअर सेंटर मधील १५ व मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमधील आठ रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी (ता.२०) या २३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शुक्रवारी रात्री उशिराने ८७ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता.२०) सकाळी १८ आणि दुपारी ५८ असे एकुण ७६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालात राजनगर, पिरबुऱ्हाणनगर, रहेमतनगर आणि भगतसिंग रोड या परिसरातील अनुक्रमे ३८, ६२, ४८, व ५५ वर्षाच्या चार रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील पीरबुऱ्हाण नगरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कातील सर्व जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 

हेही वाचा - सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्याची गरज....कोण म्हणाले ते वाचा ​

रुग्णसंख्येत वरचेवर भर पडत आहे

आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या फक्त २४ वर आली होती. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून शहरातील रस्ते आणि जिल्ह्याच्या सिमा सैल करण्यात आल्याने पर जिल्ह्यातून शहर आणि गाव खेड्यात मोठ्या प्रमाणावर प्रवाशी दाखल होत आहेत. या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासह इतरांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याने जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वरचेवर भर पडत आहे.  

हेही वाचा - जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी

बाधितांची संख्या ३०४

शनिवारी पंजाब भवन कोविड केअरसेंटर मधील १५ रुग्णांने कोरोनावर मात केली. शिवाय मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमधील आठ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यापाठोपाठ दिवसभरात पुन्हा चार पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३०४ वर इतकी झाली. आतापर्यंत एकूण २०९ व्यक्ती कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. 

तर पुणे आणि हैदरबाद येथून आलेले १२, १६ व ४५ असे तीन प्रवाशी हे त्या शहरात असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथे संदर्भित करण्यात आले असल्याने ३०४ पॉझिटिव्ह रुग्णामध्ये या तीन रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfortable Twenty Three Positive Patients Overcome Corona Nanded News