esakal | जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात जिल्ह्यातील पहिली कोरोना चाचणी लॅब सुरु झाली. त्यानंतर मागील आठवड्यात विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकरीय रुग्णालय तथा महाविद्यालयात दुसरी लॅब सुरु झाल्यापासून तपासणीकरिता घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालांचा रिपोर्ट दर चार तासाच्या अतंराने आरोग्य विभागास प्राप्त होत आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाचा परिसर आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे सोपे  होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शुक्रवारी (ता. १९) तपासणी करिता घेण्यात आलेल्या ८७ स्वॅबचा अहवाल शनिवारी (ता. २०) सकाळी प्राप्त झाला. यात पीरबुऱ्हाण येथील ६२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू नंतर तपासणी करिता स्वॅब घेण्यात आला होता. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत मृत्यूची संख्या १४ वर पोचल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 


रविवारी (ता. २०) पीरबुऱ्हाणनगर मधील गल्ली नंबर दोन मधील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्‍ह्यात कोरोनाचा १४ वा बळी गेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात सर्वप्रथम पीरबुऱ्हाणनगर येथेच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळुन आला होता.

हेही वाचा-  सहा महिन्याच्या बालकाची कोरोनावर मात

पीरबुऱ्हाणनगरात दुसरा पॉझिटिव्ह 

जिल्हा प्रशासनाने तत्काळ पीरबुऱ्हाणनगर परिसर कंटेंन्टमेंट झोन घोषीत करुन या भागातील बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील अनेकची तपासणी केली होती. तसेच अवश्यकतेनुसार स्वॅब घेण्यात आला होता. यानंतर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नव्हते. पीरबुऱ्हाणनगर पासून सुरु झालेली ही मालिका तिथेच थांबली होती. 

हेही वाचा- परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना मिळाला कॉँग्रेसतर्फे आधार...​

जिल्ह्यात पॉझिटिव्ह संख्या ३०२

सध्या शहरातील इतर भागात कोरोना बाधीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पीरबुऱ्हाणनगर पासून सुरु झालेली बाधीत रुग्णांची संख्या या भागात पुढे वाढली नाही. मात्र शनिवारी (ता. २०) पुन्हा पीरबुऱ्हाणनगर भागात एका व्यक्तीचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळीची संख्या १४ इतकी झाली असून जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३०२ इतकी झाली आहे. यातील १८६ रुग्ण उपाराअंती बरे झाल्याने त्यांना रुग्णालायातून सुट्टी देण्यात आली. तर १०२ बाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 

loading image