esakal | जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मदनापुरमध्ये विनयभंगाची तक्रार; सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सिंदखेड पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली त्यानुसार संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मदनापुरमध्ये विनयभंगाची तक्रार; सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) :जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माहूर तालुक्यातील मदनापूर येथील एका विवाहित महिलेला शेतात जात असताना पूर्वग्रहदूषित हेतूने हात धरुन विनयभंग केल्याची तक्रार (ता. सात) रोजी सिंदखेड पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली त्यानुसार संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,माहूर तालुक्यातील मौजे मदनापूर शिवारात मकत्याने केलेल्या शेतात विवाहित महिला एकटी जात असल्याचे पाहून संशयित आरोपी गजानन प्रकाश नेवारे रा. मदनापूर याने महिला एकटी असल्याचा फायदा घेत वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिल्यावरून सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधानाच्या विनयभंगाच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हेमंत मडावी हे करत आहेत. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकाराबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असताना मात्र मदनापूर गावात वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान पोलिसांकडून घटनेचा निष्पक्ष तसेच योग्य दिशेने तपास करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image