esakal | अर्धापूर पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पुर्ण करा-अमर राजुरकर
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर पाणी पुरवठा

अर्धापूर पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पुर्ण करा- अमर राजुरकर

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापूर शहरातील विकास कामांसाठी येणा-या काळात खूप मोठा निधी उपलब्ध होणार असून पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पुर्ण करा. येत्या दिवाळी आधी शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन करत शहरातील भूमीगत गटार योजना व रस्त्यांचे कामे करण्यात येणार असल्याची ग्वाही विधान परिषद सदस्य अमर राजुरकर यांनी गुरुवारी (ता. 27) जलद पुजनाच्या सोहळ्या प्रसंगी दिली.

शहरातील पाणी टंचाई दुर व्हवी व अर्धापूरकरांना शुध्द पाणी मिळावे यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करुन पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. या योजनेवर सुमारे 28 कोटी खर्च होणार असून या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आले. या योजनेसाठी निमगाव येथून मुख्य जलवाहीनेतून पाणी शहरातील जलशुध्दीकरण केंद्रात आनाले जाणार आहे. या जलवाहीनेतून पाणी येणे सुरू झाले असून जलपुजनचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा - भारतीय राज्यघटनेचा संदर्भ आज द्यायचं कारण, म्हणजे गेले काही दिवस सोशल मीडियावर सुरू असलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा गदारोळ.

जलपुजन झाल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, पप्पु कोंढेकर, तालुकाआध्यक्ष बालाजी गव्हाने, शहराध्यक्ष राजु शेटे, शेख लायक, डाॅ विशाल लंगडे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठान, तहसीलदार सुजित नरहरे, गटविकास अधिकारी मिणा रायतळे, अभियंता नागनाथ देशमुख, अभियंता दिपक मुळे आदी उपस्थित होते.

या योजनेची माहिती दिपक मुळे यांनी करून काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती दिली. तर या पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू असून दिवाळी आधी अर्धापूरकरांना शुध्द पाणी मिळेल आशी ग्वाही सुशील अग्रवाल यांनी दिली. शहरात पाणी पुरवठा योजनेकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे विशेष लक्ष असून नगरपंचायतीच्या पदाधिकारी व अधिका-यानी वेगळीच लक्ष घालून काम पूर्णत्वाला न्यावे आशा सुचेना जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांनी दिल्या. यावेळी नगरसेवक पप्पु बेग,आर आर देशमुख, छत्रपती कानोडे, राजु शेटे यांनी सुचना मांडल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोरखनाथ राऊत यांनी केले. यावेळी नगरसेवक नासेरखान पठान, मुसबीर खतीब, इम्राण सिद्दीकी, मुख्तेदरखा पठान, गाजी काजी, फेरोज कुरेशी, नामदेव सरोदे, आफसर सिद्दीकी, उमेश सरोदे, महंमद सुलतान, प्रवीण देशमुख, निळकंठ मदने, शेख मकसुद ,डाॅ उत्तम इंगळे, बाळू पाटील, राजु पाटील, कामाजी आटकोरे, बालाजी कदम, शंकर ढगे, सोनाजी सरोदे, सोनाजी राऊत, व्यंकटी राऊत, संजय लोणे,चंद्रमुणी लोणे आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे