स्वॅब देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल  प्रशासनाचे दुर्लक्ष; महिला, मुलांची कुचंबना 

शिवचरण वावळे
Thursday, 3 September 2020

कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच अनेकांच्या मनात धडकी भरत आहेत. असे असले तरी, अनेजन खबरदारी म्हणून कोरोनाची लक्षणे दिसण्यापूर्वीच स्वॅब देण्यासाठी फिवर क्लिनिकमध्ये येऊन स्वॅब देण्याची हिम्मत दाखवत आहेत. मात्र स्वॅब देण्यापासून ते रिपोर्ट येईपर्यंत खाळजाची ठोका चुकत आहे आणि यातच स्वॅब घेणाऱ्या डॉक्टराकडून कुचंबना होत असेतर का? 

नांदेड ः कोरोना बाधित रुग्णांच्या परिवारातील व संपर्कातील अनेक संशयीत व्यक्ती स्वतःहून नाना - नानी पार्क येथील कोरोना टेस्ट सेंटरमध्ये जाऊन कोरोनाची रॅपीड टेस्ट करण्यासाठी येत आहे. मात्र, तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींना डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. विशेष करुन महिला व मुलांची कुंचबना होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

नांदेडला मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढल्याने शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी जागा शिल्लक नाही. अनेकजण कोरोना चाचणीसाठी आल्यास आधार कार्ड व घरचा पत्ता यासाठी तगादा लावत आहेत. डॉक्टर व नागरीक यांच्यात शाब्दिक चकमक उडत असून उपस्थित डॉक्टर त्या व्यक्तींची टेस्ट करण्यासाठी देखील नकार देत असल्याचे अनेक नागरीकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा- नांदेड रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, सहा रुग्णांचा मृत्य ​

स्वॅब देण्यासाठी आलेल्या महिला मुलांची अडवणूक

मंगळवारी (ता. एक) एक महिला आपल्या मुलांसोबत कोरोनाची टेस्ट करण्यासाठी नाना नानी पार्क येथे आली होती. तिच्या मुलांचे आधार कार्ड नसल्याने नाना नानी पार्कमध्ये कर्तव्यावर असलेल्या परिचारिका व डॉक्टरांनी त्या महिलेच्या मुलांची टेस्ट करण्यास नकार दिला असल्याचे त्या महिलेनी सांगितले. स्वॅब घेणाऱ्या टिमच्या या आडमुठ्या धोरणामुळे कोरोनाची चाचणी करण्यासाठी आलेल्या अनेक महिला व लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर त्या रुग्णास गेट बाहेर काढून गेट बंद करण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. 

हेही वाचा- शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन ​

महापालिकेचे स्वॅब घेणाऱ्याकडे दुर्लक्ष

स्वॅब घेणाऱ्या डॉक्टरांच्या मनमानीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देखील दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना टेस्ट करण्यासाठी नकार देण्याची हिंमत डॉक्टर करत असल्याचे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या विषयी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी अनेक वेळा संपर्क केला तरी देखील त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. की एसएमएस किंवा व्हॉटस्अपला देखील रिप्लाय मिळत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The condition of the citizens who came to give swabs Negligence of administration; Women, children Nanded News