esakal | नांदेड रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, सहा रुग्णांचा मृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

मंगळवारी ‘आरटीपीसीआर’नुसार १२३ व अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत २५७ असे ३८० जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्ण संख्या सात हजार ४०७ इतकी झाली

नांदेड रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, सहा रुग्णांचा मृत्य

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेडः आठवडाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. मंगळवारी (ता. एक) घेण्यात आलेल्या स्वँबपैकी बुधवारी (ता. दोन) एक हजार ६१४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १९५ निगेटिव्ह तर ३८० स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हा आतापर्यंतचा जिल्ह्यातला सर्वात मोठा आकडा आहे. दरम्यान, उपचार सुरु असताना दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर औषधोपचारानंतर बरे झाल्यामुळे ११५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

मंगळवारी ‘आरटीपीसीआर’नुसार १२३ व अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत २५७ असे ३८० जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्ण संख्या सात हजार ४०७ इतकी झाली आहे. बुधवारी पाच रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने २४३ जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी ११५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत चार हजार ७७७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी पोहचले आहेत. 

हेही वाचा- शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन ​

२४९ रुग्णांची प्रकृती गंभीर 

हिंगोली गेट नांदेड येथील पुरुष (वय ६४), तरोडातील पुरुष (वय ६८), मगनपुरा येथील पुरुष (वय ८०), पोलीस कॉलनी नांदेडातील पुरुष (वय ५३), तरोडा महिला (वय ६०), कासराळी बिलोली पुरुष (वय ६०) या सहा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ३७५ स्वॅबची तपासणी सुरु होती. बाधित रुग्णांपैकी २४९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सध्या दोन हजार ३३७ बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. 

बुधवारी या भागात आढळून आले रुग्ण 
नांदेड शहर - १६७, नांदेड ग्रामीण - २५, बिलोली - १५, भोकर - १५, लोहा - सात, नायगाव - १०, कंधार - सात, माहूर - २०, अर्धापूर - १९, मुखेड - २०, किनवट - एक, देगलूर - १७, धर्माबाद - नऊ, उमरी - पाच, हदगाव - १६, मुदखेड - १६, बीड - एक, हिंगोली - सहा, लातूर - एक, परभणी - एक, यवतमाळ - दोन असे ३८० जण बाधित झाले आहेत. 


हेही वाचा- नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांना कोरोनाची बाधा ​

नांदेड कोरोना मीटर 

एकुण बाधित रुग्ण - सात हजार ४०७ 
बुधवारी पॉझिटिव्ह - ३८० 
बुधवारी मृत्यू - सहा 
एकुण मृत्यू - २४३ 
बुधवारी कोरोनामुक्त - ११५ 
एकुण कोरोनामुक्त - चार हजार ७७७