दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास कॉंग्रेस पक्षाचा पाठींबा; माहूर तहसिल कार्यालयासमोर कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

बालाजी कोंडे,
Thursday, 3 December 2020

गुरुवारी(ता.३) माहूर तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष् संजय राठोड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे,शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, उपनगराध्यक्षा आश्विनी तुपदाळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

माहूर (जिल्हा नांदेड ) - शेतकरी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे चालु असलेल्या शेतकरी आंदोलनास काँग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिला आहे. गुरुवारी (ता. ३) माहूर तहसिल कार्यालया समोर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

गुरुवारी (ता. ३) माहूर तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष् संजय राठोड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे,शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, उपनगराध्यक्षा आश्विनी तुपदाळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात साडेनऊ लाख अर्जदारांनी भरला ४४ कोटींचा विमा हप्ता -

शेतकरी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे चालु असलेल्या शेतकरी आंदोलनास यावेळी जाहीर पाठींबा दिला.केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली. धरणे आंदोलन करण्यात आले. अव्वल कारकुन संतोष पवार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन देण्यात आले.

सदरिल आंदोलनात डॉ. निरंजन केशवे, देवीदास मांजरमकर,दिलीप मुनगिलवार, विश्वनाथ कदम,माजी नगरसेवक शिवलींग टाकळीकर, सचिन बेहेरे, आजीम सय्यद, अब्दुल मुनाफ शेख ईस्माईल,शेख निसार शेख मस्तान, राजु सौदंलकर, शेख जब्बार शेख गफार,आकाश कांबळे, दिपक मुरादे, संजय गायकवाड, सिद्धार्थ तामगाडगे, जगदीश वडस्कर,नारायण आगीरकर करीमशाह तैय्यबशाह यांच्यसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress's support to the farmers' movement in Delhi Congress's protest in front of the Mahur tehsil office nanded news