
अर्धापूर तालुक्यात काॅग्रेसमध्ये इत्सुकांची संख्या खूप मोठी आहे. यात काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. आर. कदम, बाबुराव कोंढेकर, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख आदींच्या नावाची चर्चा आहे.
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडल्यानंतर आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची पडघम वाजु लागले आहेत. जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या बॅंकेचे अर्धापूर तालुक्यात 23 मतदार आहेत. अर्धापूर तालुक्यात काॅग्रेसमध्ये इत्सुकांची संख्या खूप मोठी आहे. यात काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. आर. कदम, बाबुराव कोंढेकर, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख आदींच्या नावाची चर्चा आहे.तर भाजपाचे डाॅ लक्ष्मण इंगोले यांना संधी मिळू शकते.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंक आवसायनात निघाल्यानंतर गेल्या वेळेस झालेल्या निवडणुकीत काॅग्रेस विरुद्ध सर्व पक्षाचे एक पॅनल झाले होते. यात काॅग्रेसच्या विरोधी पॅनलला बहुमत मिळाले होते. गेल्या सहा वर्षात बॅंकेच्या राजकारणात ब-याच उलथापालथ झाल्या आहेत. बॅंकेची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारते आहे.
हेही वाचा - Breaking : डुकरांनी ताेडले मृतदेहाचे लचके; नांदेडकरांचा जिल्हा रुग्णालयावर राेष
जिल्ह्यातील 16 तालुके बॅंकैचे कार्यक्षेत्र आहे. अर्धापूर तालुक्यात 23 मतदार आहेत. गेल्या वेळेसच्या निवडणूकीत केशवराव इंगोले पाटील निवडून आले होते. या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटीसह अन्य सहकारी संस्थेचे सभासद मतदार असतात. संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्या संस्थेतील एका सदस्याच्या नावाने ठराव घेऊन मतदानाचा अधिकार देण्यात येतो. अर्धापूर तालुक्यातील 23 मतदारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर, अर्धापूर, मुदखेड या तीन तालुक्यातील उमेदवारांची निवड पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या संमतीने होणार असल्यामुळे त्यांचा शब्द अंतिम राहणार आहे. अर्धापूर तालुक्यात काॅग्रेसचे जेष्ठ नेते बी. आर. कदम, माजी सभापती बाबुराव कोंढेकर, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख आदींच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपचे पॅनल झाले तर मालेगाव येथील माजी उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले यांना संधी मिळू शकते.
संपादन - प्रल्हाद कांबळे