वीजग्राहकांनी वीजबिलांचा गो- ग्रीन हा पर्यावरणपूरक पर्याय निवडावा- डॉ. नरेश गिते

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 7 October 2020

गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे.तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे

नांदेड : वीजग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई- मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे.

गो- ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो- ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

हेही वाचा  नांदेड : मुदखेड भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र आघाडी शासनाचा जाहीर निषेध

ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध्‍ करून दिले जाते

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेत स्थळावर  ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध्‍ करून दिले जाते. या सर्व ग्राहकांनाता. एक डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी लागणार आहे.

येथे क्लिक कराएसीबीचा व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळणारा लाचखोर पोलिस कोठडीत -

नांदेड परिमंडळातील वीजग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

नांदेड परिमंडळांतर्गत गो- ग्रीनचा वीजबिलांचा चार हजार 803 वीजग्राहकांनी पर्याय निवडून आर्थिक बचत तर केलीच आहे. शिवाय पर्यावरणस्नेही झाले असल्याचे पाऊलही टाकले आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील दोन हजरा 594 वीजग्राहकांचा, परभणी जिल्हयातील एक हजार 451 वीजग्राहकांचा तर हिंगोली जिल्हयातील 758 वीजग्राहकांचा समावेश आहे. नांदेड परिमंडळातील वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो- ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनीही केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumers should choose eco-friendly alternative to goggles of electricity bills Dr. Naresh Gite nanded news