
Contractors
sakal
नांदेड : जिल्ह्यातील दीडशे कंत्राटदारांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे देयक शासनाकडे दोन वर्षांपासून थकीत असल्याने कंत्राटदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत गावोगावी पाणीपुरवठ्याची काही कामे पूर्ण करूनही त्यांना अद्याप निधी मिळालेला नाही. परिणामी, कंत्राटदारांना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या दारात रोज खेटे मारण्याची वेळ आली आहे.