esakal | भोकरमध्ये नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच फुटले वादाचे 'नारळ'
sakal

बोलून बातमी शोधा

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती

भोकरमध्ये नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच फुटले वादाचे 'नारळ'

sakal_logo
By
बाबूराव पाटील

भोकर ( जिल्हा नांदेड ) : येथील बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी संगनमत करुन महत्वाचे निर्णय घेतांना संचालक मंडळाला जाणीवपूर्वक डावलल्या जाते. अशा कारभाराला कंटाळून गूरुवारी (ता. १०) उपसभापतीसह दहा संचालकांनी मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. बाजार समितीसाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची भव्य ईमारत उभारण्यात आली असून सोमवारी (ता. १४) रोजी उदघाटन सोहळा आयोजित केला आहे. सदरील कार्यक्रमाची जय्यत तयारी सूरु असताना गूरुवारी समितीची मासिक बैठक आयोजित केली होती. सभापती व सचिव यांनी संगनमत करुन त्यांच्या हिताचे निर्णय घेतात. ऊर्वरित संचालकांना जाणीव पूर्वक डावलल्या जाते. नव्याने उभारण्यात आलेल्या ईमारतीत हलक्या प्रतीचे साहित्य वापरण्यात आले असून मर्जीतल्या कंत्राटदाराशी हातमीळवणी करुन हित साधले आहे.

हेही वाचा - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विष्णुपूरी प्रकल्प सध्या स्थिती 92 टक्के भरले आहे.

बैठकीच्या इतिवृता (अजंडा) मध्ये मान्य नाही असे विषय टाकून सभेची नोटिस काढल्याने आम्हाला ते मान्य नाही म्हणुन सभेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. असे जिल्हा उपनिबंधकास दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर उपसभापती गणेश राठोड, संचालक सतीष देशमुख, विजयमाला देवतुळे, अप्पाराव राठोड, ललीता कदम, अनुसयाबाई बूध्देवाड, पंकज पोकलवार, धोंडींबा भिसे, गणेश कापसे, राकुमार अंगरवार यांच्या स्वाक्ष-या आहेत.

बाजार समितीच्या बैठकीत सभागृहाची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. कंत्राटदारांकडून अंदाज पत्रकानूसार शासनाच्या नियमाप्रमाणे ईमारतीचे काम केले आहे. मंजूरीसाठी सर्व संचालकांची उपस्थिती होती त्यांच्या स्वाक्ष-या पण आहेत. आज केलेले आरोप हे बिनबुडाचे असून मला व सभापती यांना बदनाम करण्यासाठी खोटे निवेदन दिले आहे. कामात कसलाच गैरप्रकार झाला नाही.

- पी. जी. पूजेकर, बाजार समिती सचिव, भोकर.

संपादन- प्रल्हाद कांबळे