
नांदेड : कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह इतर सर्व यंत्रणा दिवसराञ काम करत आहेत. माञ असे असले तरी रूग्णांची संख्या कमी नसून ती वाढतच चालली आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक विभाग काम करत असला तरी त्यांच्यासोबतच एकमेकांत समन्वय असणे गरजेचे आहे. समन्वय कमी असल्यामुळे अडचणीत भर पडत आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ११३० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ५३ मृत्यू झाले आहेत. सध्या ४५८ जणांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाउनमध्ये पहिल्या टप्प्यात परिस्थिती चांगली होती. सुरुवातीला रुग्ण आढळून आले नाहीत. माञ नंतर परिस्थिती बदलत गेली. पिरबुह्राणनगर भागात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर इतर भागातही रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली.
सामुहिक प्रयत्न हवेत
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अजुनही कोरोना व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. त्यात सामुहिक प्रयत्न गरजेचे आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तसेच आरोग्य यंत्रणा यांच्यासह महापालिका व इतर विभागाकडून समन्वयातून काम झाले पाहिजे.
अंमलबजावणी यंत्रणा सुस्त
अधिकारी तळमळीने काम करतात पण त्यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली काम करणारी यंत्रणा बरीच सुस्त आहे. याचा अनुभव अनेकदा आला आहे. त्यामुळे या सुस्त यंत्रणेला हलविण्याची गरज आहे. स्वँबसाठी स्वतहून माणसे पुढे येत आहेत. अशावेळी त्यांचे रिर्पोट लवकर देणे महत्त्वाचे आहे. माञ , यंत्रणा सुस्त झाली की मग पुढील सर्व प्रक्रिया लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे यंत्रणा सुस्त होणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच विभाग प्रमुख कामात टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्याच्या इतरांवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा सुस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही आवश्यक आहे.
नागरिकांकडून प्रतिसाद चांगला हवा
प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही नागरिकांकडून माञ त्यास प्रतिसाद कमी मिळत आहे. हे सर्व जे काही चालले आहे. हे आपल्या भल्यासाठी आहे. याची अनेकांना कल्पनाही नाही. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने लॉकडाउनमध्येही आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे . नाहीतर रुग्णसंख्या आटोक्यात येणे अवघड आहे. कितीही उपाययोजना केल्या तरीसुद्धा अवघड आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. तरच रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास तसेच व्यवहार सुरळीत होण्यासाठी मदत होईल.
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.