
नांदेड : आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका सहा महिन्याच्या बालकाचा शुक्रवारी (ता.१९) दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने व दिवसभरात केवळ एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, शुक्रवारी (ता.१९) संध्याकाळी तिसरा अहवाल प्राप्त झाला त्यात तीन प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता तीनशे इतकी झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
गुरुवारी (ता.१८) दिवसभरात दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता.१९) सकाळी १९ स्वॅब अहवाल आले, यातील सर्वच्या सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील सुंदरनगर येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ संध्याकाळी तिसरा अहवाल प्राप्त झाला, यात हैदराबाद येथून आलेल्या (मंडी) इतवारा येथील एका ४५ वर्षीय तर पुणे येथुन आलेल्या नाथनगरातील १६ आणि १२ वर्षीय युवतींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी दिवसभरात एकुण चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.
हेही वाचा - सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्याची गरज....कोण म्हणाले ते वाचा
१८६ बाधितांना रुग्णालयातून सुटी
जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या तीनशे एवढी झाली आहे. शुक्रवारी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील एक व डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील चार असे पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकुण १८६ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी १९ आणि सायंकाळी ४८ रुग्णांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात सुंदरनगरच्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तिसऱ्या अहवालात अजून तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीनशे इतकी झाली आहे. त्यापैकी १८६ बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
८७ व्यक्तींचे स्वॅब तपासणी सुरु
उर्वरित १०६ बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन बाधितांमध्ये ५२ वर्षाच्या एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे. शुक्रवारी (ता.१९) ८७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होईल. जनतेने प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - ३००
मृत्यू संख्या - १३
रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - १८६
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - १०६
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या - ८७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.