esakal | कोरोना ब्रेकिंग : नांदेडला चारशेचा आकडा पार, शुक्रवारी १६ रुग्ण सापडले
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी पाठविण्यात आलेले व त्यापूर्वी प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता. तीन) १०६ अहवाल प्राप्त झाले. यात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, बाधित रुग्णांमध्ये पाच महिलांचा तर ११ पुरुषांचा समावेश 

कोरोना ब्रेकिंग : नांदेडला चारशेचा आकडा पार, शुक्रवारी १६ रुग्ण सापडले

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविलेल्या ९० स्वॅबचा शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात १६ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४१४ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

गुरुवारी (ता. दोन) दिवसभरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तर सायंकाळी उशीराने आलेल्या अहवालात एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४१४ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, शुक्रवारी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील सात व डॉ. शंकरराव चव्हाण शासकरीय रुग्णालयातील एक असे सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आत्तापर्यंत ३०६ रुग्णांवर उपचार घेऊन घरी पाठविण्यात आल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.  

हेही वाचा - बाभळीचे पाणी तेलंगणा राज्यात; एक दरवाजा उघडला ​

१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

गुरुवारी पाठविण्यात आलेले व त्यापूर्वी प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता. तीन) १०६ अहवाल प्राप्त झाले. यात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, बाधित रुग्णांमध्ये पाच महिलांचा तर ११ पुरुषांचा समावेश असून, पाच महिलांपैकी कंधार येथील २३ आणि ४५ वर्षांच्या दोन महिलांचा, गवळीपुरा येथील वय २०, चक्रधरनगर येथील ६५, श्रीनगर येथील ३८ वर्ष वय असलेल्या महिलांचा तर, नवीन कौठा ४२, विष्णुपुरी ३१, देगलुरनाका रहेमतनगर ५०, विकासनगर ३५, श्रीनगर १० व १७ वर्षाची दोन मुले, आंबेडकरनगर ३५ व ३८, बळीरामपूर २१, उस्माननगर २७ व कंधार येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. 

हेही वाचा - खळबळ : कत्तलीसाठी बांधलेल्या ३४ गोवंशाची सुटका ​

९० जणांवर उपचार चालू

जिल्ह्यात ९० बाधीत रुग्णावर उपचार सुरु असून, त्यापैकी चार महिला आणि सहा पुरुष असे एकुण दहा रुग्णांची तब्येत नाजुक असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले. ९० बाधीत रुग्णांपैकी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात २९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६ रुग्ण, मुखेड कोविड सेंटर एक, देगलुर कोविड केअर सेंटर एक, हदगाव कोविड सेंटर एक या शिवाय जिल्हा रुग्णालयात दोन तर, औरंगाबाद येथे नऊ आणि सोलापूर येथे एक असे दहा रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत. शुक्रवारी पुन्हा ९३ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल शनिवारी संध्याकाळपर्यंत येणार असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचलेच पाहिजे - 

नांदेड कोरोना संदर्भातील संक्षिप्त माहिती
- आज पॉझिटिव्ह - १६
- एकूण रुग्णसंख्या - ४१४
- उपचार सुरु - ९०
- बरे होऊन घरी परतले - ३०६
- आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू