
गुरुवारी पुन्हा पाच रुग्ण पॉॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ३९६ इतकी झाली आहे.
नांदेड : जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी (ता. दोन) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णांची संख्या आता ३९६ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी पुन्हा पाच रुग्ण पॉॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ३९६ इतकी झाली आहे.
गुरुवारी (ता. दोन) सकाळी २८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी नव्याने सापडलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णापैकी निजाम कॉलनी, खुदबईनगर येथील ६० व ४० वर्षाच्या दोन महिलांचा तर, जुना मोंढा (वय ३६), हैदरबाग (वय ५३) आणि मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील एका ३० वर्ष अशा तीन पुरुष मिळून पाच बाधितांचा यात समावेश आहे. १४ अहवाल निगेटिव्ह आले तर, नऊ अहवाल अनिर्णित अवस्थेत ठेवण्यात आले असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१ कोटींचे अनुदान मिळणार
२९२ रुग्ण कोरोनामुक्त
गुरुवारी पाच रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ३९६ इतकी झाली असून, बुधवारी संध्याकाळपर्यंत २९२ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ८७ बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहे. तर आत्तापर्यंत १७ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. रोज नव्याने बाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. विशेष म्हणजे कोरोना आजारातुन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी, मागील काही दिवसापासून मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे.
हेही वाचा - सचखंड गुरुद्वारा : चीनच्या सिमेवरील शहीद जवानांच्या कुटुंबियाना ११ लाखाची मदत
अफवांवर विश्वास ठेऊ नका
आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या बाधीत रुग्णांना उच्चरक्तदाब, मधुमेह आणि श्वासनाचा त्रास असल्यामुळे व उपचारास प्रतिसाद न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असलेले शेकडो रुग्ण कोरोनातुन मुक्त झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण संख्येत खंड पडत नसला तरी, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.