esakal |  कोरोना : आज शुक्रवारपासून लोहा शहर पाच दिवस कडकडीत बंद राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोहा पालिकेने ( ता. २८ ते एक)  असे पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला  विरोध केला जातो आहे.

 कोरोना : आज शुक्रवारपासून लोहा शहर पाच दिवस कडकडीत बंद राहणार

sakal_logo
By
बापू गायखर

लोहा :  लोहा शहर व ग्रामीण भागात कोरोना या संसर्गजन्य रोगाने पाय पसरले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोहा पालिकेने ( ता. २८ ते एक)  असे पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला  विरोध केला जातो आहे. लोहा शहरातील  नागरिकांनी सामाजिक अंतर व मास्क वापरावे  असे  सांगण्यात येते आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे  आणि  नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी   यांच्यात लाॅकडाऊन साठी  तू तू- मी मी  होत आहे. 

 गत काळात नागरिकांनी स्वत: जनता कर्फ्यु पाळुन  प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.  आता लघूउद्योग  , व्यावसायिक, रोजगार या बाबत कुचुंबना होत आहे. आरोग्य विभागाने  ठरवून दिलेले  कोरोना संसर्गजन्य  बंधनाच्या नियम व कालावधी पाळला जावा माञ  बाजारपेठ बंद करू नये  असा सूर निघतो आहे.  या काळात  लोहा शहर शंभर टक्के  कडकडीत बंद ठेवण्यात विरोध असल्याचे  आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार रोहिदास चव्हाण  व काही नगरसेवक यांचे मत आहे.

हेही वाचा -  जेईई - नीट परिक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉँग्रेसचे नांदेडला आंदोलन

.लोहा शहरातच ११० रूग्ण  कोरोणा  संसर्गात आहेत 

लोहा शहरातीतील व ग्रामीण भागातील असे सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.लोहा शहरातच ११० रूग्ण  कोरोणा  संसर्गात आहेत. तर ग्रामीण भागात 75 जणांना कोरोणाची बाधा झाली आहे.

सोशल  डिस्टंस, मास्क, सॅनिटायझर व सावधानता  या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे

मागील आठवड्यापासून शहरात दररोज दहा ते पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सोशल  डिस्टंस, मास्क, सॅनिटायझर व सावधानता  या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे. पालिका प्रशासनाने कचरा डंपिंग ग्राउंड ला टाकण्या ऐवजी नांदेड- लातूर, कंधार रस्त्यावर फेकू नये. रस्त्यावर मुरूम  चिखल टाकू नये, वेळोवेळी  फवारणी करतांना काळजी घ्यावी. कोविड रुग्णांवर प्राधान्याने उपचार सुरू  ठेवावेत  शिवाय व्यापारी व इतर व्यवसायिक यांनाही या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी सुचना द्याव्यात.  

येथे क्लिक करा - शेतकरी पुन्हा संकटात : गाय, बैलांवर ‘या’ संसर्गजन्य आजाराचे विघ्न -

आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली

 " बाजारपेठेत होणारी गर्दी लोकांकडून  प्रतिबंधक उपाय योजनेकडे होणारे दुर्लक्ष पाहता कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय घेतला  आहे. दुकानदारांचा  व्यापाऱ्यांचा तसेच शहरातील जनतेचा जीव महत्वाचा आहे."

नगराध्यक्ष - गजानन सूर्यवंशी

उपनगराध्यक्ष - शरद पाटील पवार 

 " लोहा शहर व तालुक्याची बाजारपेठ बंद ठेवावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठल्याच प्रकारचे आदेश वा सक्ती नाही 

मात्र नागरिकांनी  सोशल अंतर ठेवावे. तोंडाला मास्क लावून आपले व्यवहार सावधानतेने केले तर संसर्गजन्य रोग आपल्या आटोक्यात आणता येईल."

विठ्ठल परळीकर- तहसीलदार, लोहा

" जिल्हाधिकारी विटणकर यांचे असे कुठलेही लेखी आदेश नाहीत विनाकारण  लोहा पालिकेने नागरिकांना व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये ."

- शामसुंदर शिंदे, आमदार लोहा.

संपादन - प्रल्हाद कांबळे