कोरोनाचा धिंगाना सुरुच : गुरुवारी ५६ बाधित, तर पाच जणांचा मृत्यू, ३६ रुग्ण बरे, संख्या ११३० वर पोहचली

प्रल्हाद कांबळे
Thursday, 23 July 2020

एकूण २१८ अहवालापैकी १४९ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार १३० एवढी झाली आहे. यातील ६१० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेड : जिल्ह्यात गुरुवार (ता. २३) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज ५६ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ३६ व्यक्ती    बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २२ जुलैच्या रात्री मुखेड येथील ८५ वर्षीय पुरुष, कोल्हे ोबरगाव (ता. बिलोली) ६० वर्षीय पुरुष, तर गुरुवारी (ता. २३) वालमिकनगर मुखेड ५६ वर्षीय पुरुष, सुगाीव (ता. देगलूर) येथील ५५ वर्षईय पुरुषआणि जवाहरनगर, नांदेड येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू  झाला. सदर बाधितास शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. 

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ६० एवढी झाली आहे. यात ५३ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण २१८ अहवालापैकी १४९ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार १३० एवढी  झाली आहे. यातील ६१० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४५८ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात पाच महिला व १० पुरुषांचा समावेश आहे.

३६ बाधीत बरे झाल्याने सुट्टी

आज बरे झालेल्या ३६ बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील एक, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील तीन, देगलूर एक, माहूर एक, नायगाव सात, बिलोली सहा, पंजाब कोविड केअर सेंटर येथील १५, जिल्हा रुग्णालय एक, खासगी रुग्णालयातील एका बाधिताचा यात समावेश आहे.

हेही वाचा -  कोरोना : सर्वेक्षण व तपासण्या काटेकोर होणे अत्यावश्यक- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील आयटीआय एक, लेबर काॅलनी एक, आंबेडकरनगर तीन, हडको दोन, गोकुळनगर दोन, चिरागगल्ली एक, लिंबगाव नांदेड दोन,  खोजा काॅलनी एक, वसंतनगर एक, शहीदपूरा दोन, सोमेश काॅलनी एक, चैतन्यनगर एक, छत्रपती चौक एक, पाठकगल्ली सराफा चार, वजिराबाद एक, जवाहरनगर एक, बळीरामपूर एक, वाल्मिकनगर मुखेड एक, ओमगल्ली तामसा एक, पेवा ता. हदगाव एक, हदगाव शहर एक, महादेव मंदीर देगलूर एक, सुगाव ता. देगलुर एक, सत्यमनगर देगलूर एक, खाजाबाबानगर देगलूर एक, देगलुर शहर एक, मार्केट यार्ड ता. लोहा दोन, फुलवळ ता. कंधार चार, बालाजीनगर ता. नायगाव एक, मोंढा मार्केट ता. उमरी ११, सेलु (परभणी) एक, गंगाखेड एक, वसमत एक.

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४५८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८९, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १६७, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २३, बिलोली कोविड केअर सेंटर येथे चार, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ४६, देगलूर कोविड केअर सेंटर येथे २१, उमरी नऊ, हदगाव कोविड केअर सेंटर दोन, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे ३, लोहा कोविड केअर सेंटर येथे १४, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, भोकर एक, खाजगी रुग्णालयात ४७ बाधित       व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणी साठा...? वाचा सविस्तर

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ९००
घेतलेले स्वॅब- ११ हजार ३१८,
निगेटिव्ह स्वॅब- ८ हजार ९३५
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ५६
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ११३०,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-९,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-२,
मृत्यू संख्या- ६०,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ६१०,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ४५८,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४९२.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Dhingana continues: 56 infected, five killed, 36 cuared, 1130 reached on Thursday nanded news