
सोशल मीडिया मध्यामनसमोरील मोठे आव्हान, पत्रकार सन्मान सोहळ्यात मध्यम तज्ञ डॉ. समिरण वाळवेकर यांनी व्यक्त केली चिंता
नांदेड : ग्रामीण शहरी असा भेद लक्षात घेण्यापेक्षा पत्रकारितेतील पुढील आव्हान महत्वाची आहेत. सोशल मीडिया मोठे आव्हान आहे. सोशल मीडियावर नियंत्रण नाही. पत्रकार सन्मान सोहळ्यात माध्यम तज्ञ डॉ. समिरण वाळवेकर यांनी व्यक्त केली चिंता. सोशल मीडियाची लादली जाणारी निर्बंध चिंताजनक आहेत. त्यामुळे सरकारने यासाठी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
आठशेच्या वर असणाऱ्या वृत्त वाहिन्यांनी ग्रामीण पत्रकारितेशिवाय पर्याय नाही. माझ्या आजूबाजूला काय घडतंय हे पाहण्याची गरज आहे. वातानुकूलित रुम मध्ये बसणाऱ्याना ग्रामीण भागातील प्रश्न समजत नाहीत. त्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारच हवा असतो. पण सत्य मांडले जात नाही. बातमीदारी जिवंत राहतेच असे नाही. त्यामुळे आपणास काय बदल करावा लागणार आहे पाहावे लागेल. जग बदलत आहे. त्यानुसार आपणासही बदल करावा लागेल. तंत्र शिकावे लागेल.
हेही वाचा - शौचालयाची भिंत अंगावर पडल्याने भाऊ ठार तर बहीण गंभीर
वृत्तपत्र संस्था आणि चॅनलने चाळीस टक्के कपात केली आहे. हे सर्वात मोठे आव्हान आहे. कोरोना हे फक्त निमित्त आहे. कामगार कपात ही मोठी चिंता जनक बाब आहे. आपले स्वतःचे यू ट्यूब, पेपर सुरु करणे किंवा यावर अवलंबून न रहाणे हे दोनच पर्याय आहेत. राज्यात २६ पत्रकारिता कॉलेजमधून एक हजार ८०० विद्यार्थी बाहेर पडतात. पण जॉब किती लोकांना मिळतो. आता आहे त्यांचे जॉब जात आहेत. मग येणाऱ्यांना काम कसे मिळणार आहे.
पत्रकारीतेच्या माध्यमातून अन्य काम करता येतात हे शोधण्याची गरज आहे. काम गेले म्हणून खचून जावू नका. आपल्यातील तांत्रिक बाबी समजून घ्या. त्याचा योग्य वापर करा. माध्यमकर्मी म्हणून आपणास खूप काही करता येईल याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
कोरोनात स्वतः त बदल केला नाहीत तर अस्त निश्चित
यू ट्यूब चॅनलवर आपण काय दाखविणार, आजूबाजूचे प्रश्न कसे मांडता यावर आपले भविष्य अवलंबून आहे. फेक न्युज मोठे आव्हान ठरत आहे. फेक न्युजवरुन वादळ निर्माण केले जातात. ही बाब घातक आहे. माध्यम साक्षरता शिक्षणावर नाही अनुभवावर, बुद्धीवर अवलंबून आहे. त्यामुळे वेगळा विचार करण्याची गरज आहे. आपल्यात खुप काही आहे ते बाहेर काढा. केवळ पत्रकार म्हणून राहू नका. माध्यमक्रमी व्हा. पैशासाठी मान झुकवून वागावे लागत असेल तर तशी पत्रकारिता करु नका. स्वताचं अस्तित्व, अभिमान ठेवून वागताना आपल्या कक्षा रुंदवा तरच भविष्य सुकर जाईल. आपण इतरांचे मूल्यमापन करताना स्वतः चे निरीक्षण करण्याची गरज आहे. कोरोनात स्वतः त बदल केला नाहीत तर अस्त निश्चित आहे. त्यामुळे बदल ओळखून पुढे चला. बदलत्या तंत्राचा वापर करुन स्वतः ला घडवा असे आवाहनही समिरण वाळवेकर यांनी यावेळी केले. यावेळी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबु्धे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती.