कोरोना इफेक्ट : टरबूज व खरबूज रस्त्यावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

शेतकऱ्यांना रस्त्यावर शेतातील माल विकण्याची वेळ, व्यापारी खरेदीला प्रतिसाद देत नसल्याने शेतमालाचे व भाजीपाला फळाचे नुकसान
रस्त्यावर टरबूज विकणे
रस्त्यावर टरबूज विकणे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील (Kinwat) शेवटच्या टोकाला असणाऱ्या शिवणी परिसरातील शेतकरी हतबल झाला असून सध्या कोरोना महामारीचा परिणाम (corona virus) मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर झाल्याचा पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे टरबूज, खरबूज आणि भाजीपाला खरेदीसाठी व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर बसून विकावा लागत आहे. (Corona effect: Time for farmers to sell watermelons and melons on the street)

रमजान महिन्यात या फळांना मोठी मागणी राहते. तरी व्यापारी खरेदीसाठी फिरकत नसल्याने नाईलाजास्तव शेतकरी आपले टरबूज, खरबूज रस्त्यावर बसून विक्री करत आहेत. फळ उत्पादनासाठी लागलेला खर्च काढण्याच्या प्रयत्नात आहेत. टरबूज लागवडीच्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यामुळे टरबूजापासून चांगला नफा मिळेल या अपेक्षित असणाऱ्या शेतकऱ्यांना फळतोडणीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढल्याने शासनाला लाँकडाऊन लावावा लागला.

हेही वाचा - आरोग्‍य सेवेत परिचारिका नेहमी तत्‍परतेने कार्यरत राहतात- मंघाराणी अंबुलगेकर

अशातच शिवणी येथील शिक्षक असणारे गुरुनाथ बोंदरवाड यांनी आपल्या एका एकरात टरबूज व खरबूज या पिकाची लागवड केली. त्यांना यासाठी नव्व्द हजार ते एक लाख रुपये खर्च आला असून त्यांना या पिकातून 25 टन टरबूज उत्पादनाची अपेक्षा असून त्यांनी आजपर्यंत 15 टन टरबुजाची विक्री केली. 10 टन टरबुज पिकाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी गावोगावी गाडी भाड्याने करुन विक्री करीत आहेत. कधीकधी गाडी भाडे या टरबूज विक्रीतुन निघत नसल्यामुळे मार्केटला न्यावयाचे म्हटल्यावर शिवणी गावच्या जवळपास मार्केट नाही. तालुका पन्नास किलोमीटर तर जिल्हा दीडशे किलोमीटरचे अंतर असल्याने गाडीचे भाडे परवडत नसल्यामुळे त्यांनी शिवणीच्या बस स्टॅन्डवर विक्री करत आहेत असे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com